News

पावसासाठी पोषक हवामान नसल्याने कोकणत पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र रविनवारी सकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. काही वेळ पडत असलयाने शेतातील ओलावा कमी होऊ लागला आहे.

Updated on 24 August, 2020 7:57 PM IST


पावसासाठी पोषक हवामान नसल्याने  कोकणत पावसाचा जोर ओसरला आहे.  मात्र रविनवारी सकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात  तुरळक ठिकाणी  पाऊस झाला आहे. काही वेळ पडत असलयाने शेतातील ओलावा कमी होऊ लागला आहे.  सततच्या पावसाने पिके धोक्यात आली होती, पण उन्हामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.  दरम्यान कोकणात पावसाने ओसरला  आहे. 

पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नदी - नाल्यांच्या पाणीपातळी घट झाली आहे. भात शेतीला पुरक पाऊस पडल्याने  शेतकऱ्यांमध्ये  समाधानाचे वातावरण आहे.   गेल्या आठवड्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु मागील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर ओसरला आहे.  गेल्या  पंधरा ते वीस  दिवस मध्य महाराष्ट्रातील  सर्वच जिल्ह्यांमधील  विविध  भागांत चांगला  पाऊस झाला आहे.  सध्या  तूर, कापूस, बाजरी ही पिके  वाढीच्या अवस्थेत  आहेत. बाजरी पीक कणसाच्या अवस्थेत आहेत. अती पावसामुळे मूग, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.  अनेक ठिकाणी भात पीक जोमात आहेत. पुणे , सातारा, सांगली, सोलापूर, तसेच खानदेशातली सर्व जिलह्यांत आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत. 

नाशिक जिल्ह्यात पेरण्या मागील वर्षाच्या तुलनेत चांगल्या आहेत. मात्र पश्चिम  पट्ट्यात भात लागवी अपेक्षित प्रमाणात होऊ शकल्या नाहीत.  दरम्यान कसमादे पट्ट्यातील कळवण, सटाणा, तालुक्यातील काही भागांतील पिकांना  पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे.  कोल्हापुरातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊउस झाला असून गगबावडा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली.  मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने विश्रांती  घेतली आहे. तुरळक ठिकाणी पावसाच हलक्या सरी पडत आहेत.  अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने परत शेती कामे सुरु झाली आहेत.  पावासामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत असतो, शेतकऱ्यांनी फवारणींची कामे सुरु केली आहेत.

English Summary: Presence of rains in Marathwada and Vidarbha
Published on: 24 August 2020, 07:57 IST