News

सांगली: अनेक वर्षाच्या संघर्षानंतर वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेला चालना मिळाली असून ही योजना पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच या योजनेच्या जलपुजनासाठी येऊ विश्वास व्यक्त करुन राज्यातील रखडलेल्या सर्व सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Updated on 24 December, 2018 7:58 AM IST


सांगली
अनेक वर्षाच्या संघर्षानंतर वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेला चालना मिळाली असून ही योजना पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच या योजनेच्या जलपुजनासाठी येऊ विश्वास व्यक्त करुन  राज्यातील रखडलेल्या सर्व सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा शुभांरभ मौजे रेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटीलमाजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिकेव्दारे वितरण होणार असल्याने प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल. मोठ्या प्रमाणावर जमीन ओलिताखाली येईल. असे सांगून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षापासून रखडलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पुढील सहा महिन्यात टप्प्या- टप्प्याने पूर्ण करण्यात येतील. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या योजनांसाठी शेतकऱ्यांची हजारो एकर अधिग्रहीत करावी लागली असती ती बंदिस्त नलिकेव्दारे काम होणार असल्याने आता अधिग्रहीत करावी लागणार नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था शुभांरभाचा आजचा हा सुवर्ण दिवस हे याभागाचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कष्टाच्या व पाठपुराव्याचे फलीत आहे. या योजनेमुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. ही योजना बंदिस्त नलिकेव्दारे पुर्ण होणार असल्याने शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यालाही पाणी मिळेल, असे सांगून बंदीस्त नलिकेव्दारे पाणी होणार असल्याने भूसंपादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे.

राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, बळीराजा कृषी सिंचाई योजना या योजनामधून केंद्रातून ३० हजार कोटी रुपये आणण्यात आले आहेत. यातून महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. पूर्ण करण्यात येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्रिस्तरीय समित्या तयार करुन योग्य त्या बाबींना मान्यता देवूनच टेंडर प्रक्रिया करण्यात येत असल्याने पारदर्शकता आली आहे. प्रकल्पाच्या खर्चात बचत होत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळींब, द्राक्ष व फळपिके घेतात. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल पाठवता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट तयार करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना येथून थेट विदेशात माल पाठविता येईल व त्यातून आर्थिक उन्नती होईल. चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मागणी करण्यात येत असलेली धरणाच्या खालील जागाही देण्यात येईल त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जिल्ह्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरु होत असल्याने सर्वांगिण विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी त्यांनी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या कामात ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत केली त्यांचे अभिनंदनही केले. 

English Summary: Prefer to complete the planned irrigation scheme
Published on: 24 December 2018, 07:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)