विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटे गारठा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून धुळे, निफाड येथील तापमान १० अंशाखाली घसरले आहे.
राज्यातील काही भागात दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. राज्यातील तापमानात तफावत जाणवत आहे. दिवसा उकाडा जाणवतो तर रात्री गारवा जाणवतो. राज्यात पुर्वमोसमी पाऊस हंगामाला सुरुवात झाली आहे. विदर्भात दुपानंतर वातावरण ढगाळ हवामान झाले होते. मराठवाड्यातील नांदेड व लगतच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह गारपीठ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसापूर्वी देशाच्या राजधानीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
Published on: 16 March 2020, 10:10 IST