परंतु यावेळी शेतकऱ्याच्या अडचणींचा फायदा घेऊन बियाणे कंपन्या किंवा कृषी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कृषी विभाग बुलढाणा येथे झालेल्या बैठकीत कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांना निवेदनातुन दिला आहे. बियाणे कंपन्या व कृषी केंद्रचालकावर अंकुश ठेवण्याचे काम हे जिल्हा व तालुका कृषी कार्यालयाचे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हफ्ते घेऊन अश्या चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले तर गाठ स्वाभिमानीशी असणार आहे
असा सज्जड दम यावेळी प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला. दरवर्षी प्रमाणे बियाण्यांची चढ्या दराने होणारी विक्री थांबवावी, प्रत्येक कृषी आस्थापन केंद्रावर खते व बियांण्याचे भावफलक लावण्यात यावेत, शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीची पक्की पावती द्यावी. खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांना आवश्यक तेवढेच खत खरेदी करण्याचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे लिंकिंग प्रमाणे खत विक्री, तसेच बोगस बियाणे विक्री या बाबत काही आढळल्यास तत्काळ कृषी केंद्रचालकावर व कंपनीवर कारवाई करण्यात.
या काळात शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी बियाणे व खते खरेदी करत असतात. परंतु यावेळी शेतकऱ्याच्या अडचणींचा फायदा घेऊन बियाणे कंपन्या किंवा कृषी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कृषी विभाग बुलढाणा येथे झालेल्या बैठकीत कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांना निवेदनातुन दिला आहे. बियाणे कंपन्या व कृषी केंद्रचालकावर अंकुश ठेवण्याचे काम हे जिल्हा व तालुका कृषी कार्यालयाचे आहे.
दरवर्षी प्रमाणे बियाण्यांची चढ्या दराने होणारी विक्री थांबवावी, प्रत्येक कृषी आस्थापन केंद्रावर खते व बियांण्याचे भावफलक लावण्यात यावेत, शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीची पक्की पावती द्यावी. खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांना आवश्यक तेवढेच खत खरेदी करण्याचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे लिंकिंग प्रमाणे खत विक्री, तसेच बोगस बियाणे विक्री या बाबत काही आढळल्यास तत्काळ कृषी केंद्रचालकावर व कंपनीवर कारवाई करण्यात.यामधे कृषी कार्यालयाने दिरंगाई केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कृषी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Published on: 04 June 2022, 12:09 IST