PM Kisan Yojna: गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 11 व्या हफ्त्याविषयी बरीच चर्चा चालू होती. आता या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 31 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
रविवारी जारी केलेल्या निवेदनात कृषी मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, पंतप्रधान मोदी शिमला, हिमाचल प्रदेश येथे या योजनेचा 11वा हप्ता जारी करतील. 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत गरीब कल्याण संमेलन या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या 16 योजना व या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या जनतेशी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहे.
या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्यांना विविध योजनांचा लाभ झाला आहे अशा लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. याशिवाय निवेदनात कृषी मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले की, किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान 21,000 कोटी रुपयांचा 11 वा हप्ता जारी करतील.
आता धान उत्पादकांचा प्रश्न मिटणार; विजय वडेट्टीवार यांचे मोदी सरकारला पत्र
या कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे दिल्लीतील पुसा कॅम्पसमधून उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता हा 1 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आला होता. आता मात्र शेतकरी 11 व्य हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचे महत्व अधिक आहे. नाही म्हटलं तरी जवळजवळ ६० ते ७०% लोक ही शेती आणि शेतीच्या निगडित व्यवसायांशी संबंधित असतात.
त्यामुळे केंद्र सरकारने ही योजना राबविली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आत्म निर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य हेतू होय. प्रति वर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये म्हणजेचच प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये त्याचे वितरण करते. आणि ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा केली जाते.
कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण
आतापर्यंतचा हा देशातील सर्वात मोठा एकल कार्यक्रम असल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर केले जाईल शिवाय MyGov.in द्वारेही याचे वेबकास्ट करण्यात येणार आहे. इतर सोशल मीडियावरही हा कार्यक्रम पाहता येईल
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कृषी विद्यापीठांना मिळणार कोट्यावधींचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा
Published on: 30 May 2022, 12:49 IST