Pradhan Mantri Fasal Bima Yojana : शेतकऱ्यांना पीक विमा पॉलिसी देण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती घेणार आहे. आता पीक विम्यासाठी सरकार शेतकर्यांच्या घरी येणार आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी माहिती दिली. आगामी खरीप हंगामात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या (PMFBY) अंमलबजावणीच्या सातव्या वर्षात प्रवेश करताना ही योजना सुरू केली जात आहे.
कृषी मंत्रालयाने सांगितले की, 'मेरी पॉलिसी मेरे हाथ' या घरोघरी जाणाऱ्या मोहिमेचा उद्देश सर्व शेतकऱ्यांना PMFBY अंतर्गत सरकारची धोरणे, जमिनीच्या नोंदी, आणि तक्रार निवारणाची माहिती दिली जाणार आहे.
जूनपासून सुरू होणाऱ्या आगामी खरीप हंगामात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व राज्यांमध्ये घरोघरी जाऊन ही मोहीम राबवली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे पीक नुकसान सहन करणार्या शेतकर्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
हे ही वाचा : मोठी बातमी: मोदी सरकार दुकानदारांना देणार पेन्शन; असा करा अर्ज आणि घ्या लाभ
85% लहान आणि अत्यल्प शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. Pradhan Mantri Fasal Bima Yojana अंतर्गत 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या अर्जांचा विमा उतरवण्यात आला आहे. यावर्षी 4 फेब्रुवारीपर्यंत या योजनेंतर्गत 1,07,059 कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली आहे.
पीक विमा योजना सर्वात असुरक्षित शेतकर्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात यशस्वी ठरली आहे. या योजनेत नोंदणी केलेले सुमारे 85 टक्के शेतकरी हे लहान आणि अत्यल्प शेतकरी आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पीक विम्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Published on: 19 February 2022, 02:37 IST