जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. मागील काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनामुळे महावितरण तर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे प्रत्यक्षात रीडिंग न घेता त्यांना सरासरी प्रमाणे बिल देण्यात आले. मात्र देण्यात आलेली वीजबिल अवाजवी असल्याच्या तक्रारी करत ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली. संबंधित येणाऱ्या तक्रारी निवारणासाठी महावितरणने जिल्ह्याभरात तक्रार निवारण शिबिरे घेतली.यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून विज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले.
तरीदेखील ग्राहकांकडून विज बिल भरण्यासाठी प्रतिसाद न आल्याने साडेतेरा शेकोटीच्या घरात थकबाकी जमा झाली आहे. महावितरण तर्फे मागच्या वर्षीच्या मार्च पासून वीजबिल न भरलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगा रण्यात आला आहे.
त्यामध्ये कृषी पंप धारक शेतकरी बांधवांचा समावेश आहे. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसात जळगाव जिल्ह्यातील सहा हजार 491 शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
Published on: 03 April 2021, 09:50 IST