News

राज्यातील 302 तालुक्यांमध्ये सार्वजनिकआणि खाजगी भागीदारी तत्त्वावरसघन कुक्कुट विकास गटांची स्थापना करण्यासाठी या योजनेला जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राधान्यक्रमाने सन 2021-22 या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर,पारोळा,रावेर, यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातून खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे.

Updated on 22 January, 2022 5:52 PM IST

राज्यातील 302 तालुक्यांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्त्वावरसघन कुक्कुट विकास गटांची स्थापना करण्यासाठी या योजनेला जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राधान्यक्रमाने सन 2021-22 या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर,पारोळा,रावेर, यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातून खाजगी भागीदारी तत्त्वावर सघनकुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे.

शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एका पात्र लाभार्थीची निवड ही जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांना मिळणार 5 लाख 13 हजार 750 रुपये

 सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील सघन कुक्कुट विकास गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत दहा लाख 27 हजार पाचशे रुपये असून सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान म्हणजेच पाच लाख 13 हजार 750 रुपये देय आहे.

जे लाभार्थी सद्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत तसेच या लाभार्थ्यांकडेलघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.

 31 जानेवारी 2022 पर्यंत कागदपत्रे सादर करावी

 तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती- जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा,रावेर, यावल, भुसावळ  जळगाव, अमळनेर यांच्यामार्फत प्रस्ताव आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह या कार्यालयास 31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावा. 

अधिक माहिती व अर्जाचा विहित नमुना त्यात्यातालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

English Summary: poultry udyog subsidu start in jalgaon district farmer
Published on: 22 January 2022, 05:52 IST