या आधी आपण पहिलेच आहे की जर पोल्ट्री फार्मस तसेच ब्रीडर्स असोसिएशनकडून जर शेतीमालाच्या दरात वाढ झाली तर ती नियंत्रणात आणन्यासाठी पाऊले ही उचलली जातात. मागील काही दिवसांपूर्वी सोयापेंड चे दर वाढत असल्यामुळे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रव्यवहार करून दर नियंत्रणात आणण्यासाठी मागणी केली होती. पियुष गोयल यांनी आता तर थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहले आहे की केंद्र सरकारच्या फूड कार्पोरेशन गोदामात जे मका, ज्वारी, तांदूळ तसेच कणी तसेच कोंबड्याना जे अन्न लागते ते सवलतीच्या दरात मिळावे अशी मागणी पोल्ट्री फार्मर्स आणि ब्रीडर्स असोसिएशनच्या वतीने केलेली आहे. कोंबडी ला लागणारे सोयाबीन, मका आणि शेंडपेंडीच्या अन्नच्या दरात जर वाढ झाली तर अंडी तसेच चिकनच्या दरात सुद्धा वाढ होईल.
काय आहे पत्रात?
मागील दोन दशकापासून महाराष्ट्र राज्यात पोल्ट्री चा व्यवसाय सुरू आहे जे की पहिल्या टप्यामध्ये कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री धारकांचे मोठे नुकसान झाले. कोरोनाच्या अफवेमुळे विक्री कमी झाली आणि कच्चा मालावर संकट आले. मका तसेच सोयाबीन हे पिके पक्षांचे खाद्य आहेत जे की याच्या दरात तर विक्रमी वाढ झाली आहे. मका प्रति टन १६ ते २२ हजार तर सोयाबीन ला ५ ते ६ हजार प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. या वाढीव दराचा सामना पोल्ट्री धारकांना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या फूड कॉर्पोरेशनच्या गोदामातील मका, ज्वारी, तांदूळ, कणी या सारख्या अन्नात सवलत देण्याचे पत्रात नमूद केले आहे.
सोयाबीनबाबत काय राहिली सरकारची भूमिका?
पशूंना खाद्य म्हणून सोयाबीन पिकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीन चे दर गगनाला भिडले होते जे की यावरील आयत्तशुल्क कमी करावी आणि दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे पोल्ट्री धारकांनी मागणी केली होती. या मागणीला शेतकरी वर्गाने तसेच शेतकरी संघटनेने मोठ्या प्रमाणात विरोध केला असल्याने वाढत्या दरामध्ये कोणताही हस्तपेक्ष केला जाणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगून टाकले होते.
उत्पादन घटूनही खर्च सुरुच :-
कोरोनाच्या अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायाला झळ लागली जे की कोरोनाचे अजूनही परिणाम कुक्कुटपालन व्यवसायावर होत आहेत. कोरोना आल्यापासून पशु खांद्याच्या दरात तर वाढ झाली आहेच मात्र अंडी व चिकनच्या दरात पाहिजे अशा प्रमाणत वाढ झाली नसल्यामुळे केंद्र सरकारने आता मदत करावी असे सांगितले जात आहे.
Published on: 02 March 2022, 11:03 IST