कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत निघाल्याने निर्बंध लादण्यात आले आहेत जे की नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अंडी व चिकनच्या दरात घट झालेली आहे. पुन्हा एकदा बाजारपेठा बंद होणार आहेत तसेच लोकांनी बाहेर पडणे सुद्धा कमी केले आहे त्यामुळे चिकन व अंड्याची विक्री कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून चिकन व अंड्याच्या किमतीमध्ये ३० टक्के नी घट झाली आहे. दिल्लीच्या बाजारात १ अंडे ६-७ रुपयांनी विकले जात आहे तर एक किलो चिकन ची किमंत १८० रुपये वर आलेली आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून बरोबर ११ व्या वर्षी अंड्याचे दर घसरले आहेत. दिल्लीच्या बाजारपेठेत ५०० रुपये ने शेकडो अंडी आहेत तर दुसरीकडे ४४० रुपयांनी हा दर चालू आहे.
काय आहेत अंड्याच्या सुधारित किंमती :-
सध्या मुंबई व उत्तर प्रदेशमधील अनेक मोठ्या मोठ्या शहरात अंड्याला सर्वात जास्त मागणी चालली आहे. यूपी राज्यात वाराणसी तसेच लखनऊ मध्ये १०० अंडी ५३३ रुपयांनी भेटत आहेत. दिल्लीतील बाजारपेठेत कोरोनामुळे कोण खरेदीला नाही तर दुसऱ्या बाजूस यूपी पोल्ट्री फार्मस असोसिएशनचे अध्यक्ष नवाब मलिक सांगतात की कुकटपालन करणाऱ्याला कोणीही विचारत नाही. मागील दिवसांपूर्वी वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांनी प्रगती होत न्हवती तर आता कोरोनामुळे व्यापारी वर्गाची तसेच शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे
खाद्य दरात वाढ त्यामुळे दुहेरी नुकसान :-
पोल्ट्री मधील चिकनचे दर बाजारात कमी आहेत मात्र ब्रॉयलर चिकन चे दर मात्र वाढले आहेत. कोरोनामूळे प्रतिकूल परिस्थिती ओढवली आहे तर दुसरीकडे पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाली आहे जे की सोयाबीन चे दर आहे तसेच आहेत मात्र मका च्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. मका नेहण्यासाठी वाहतुकीचा खर्च वाढत आहे त्यामुळे जवळपास प्रती क्विंटल २ हजार रुपये ला मका पडत आहे. एका बाजूस कोंबडी व अंड्याचे दर घसरले आहेत तर दुसऱ्या बाजूस पशुखाद्याच्या किमतीत वाढ होत आहे.
भविष्यात काय राहिल चित्र :-
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा हॉटेल व रेस्टॉरंट बंद करण्यात आली आहेत त्यामुळे चिकनच्या किमतीत घट झालेली आहे. १२० रुपये प्रति किलो चिकन ची किमंत आहे. कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम हा अंड्यावर झालेला आहे. फेब्रुवारी मध्ये अंडी तसेच चिकनच्या दरात वाढ होईल अशी आशा पोल्ट्रीधारकांमध्ये आहे.
Published on: 12 January 2022, 02:55 IST