शेतीला जोडवयसाय म्हणून पोल्ट्री उद्योगाकडे पाहायले जाते. दिवसेंदिवस जरी पोल्ट्री उद्योगात वाढ होत असली तरी अनेक अडचणींनाचा सामना हा करावा लागत आहेच. सध्या पशुखाद्याचे दर वाढले आहेत. खाद्य दर वाढल्यामुळे पोल्ट्री उत्पादक दर कमी करण्याची मागणी करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीन तसेच सोयापेंड चे दर आस्मानी भिडले होते जे की हे कमी करण्यासाठी मागणी केली होते मात्र यामध्ये केंद्र सरकारने आजिबात हस्तक्षेप केला न्हवता त्यामुळे सोयाबीन चे दर काय कमी झाले न्हवते. मात्र पुन्हा एकदा पशुखाद्याच्या दरात वाढ झाली असल्याने गहू आणि तांदळावर अनुदान देण्याची मागणी पोल्ट्री धारक करत आहेत.
देशात पोल्ट्री व्यवसयाचे कसे आहे स्वरुप :-
भारत देश हा बॉयलर उत्पादनात जगात चौथ्या क्रमांकावर आहे तर अंडी उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२० साली पोल्ट्री मार्केटमधून २ लाख कोटींवर उत्पादन गेले होते तर वर्षाला देशात ११ हजार ५०० कोटी अंड्याचे उत्पादन होत असल्याची माहिती पोल्ट्री ब्रीडर्सने सांगितली आहे. तसेच वर्षाला ४५ लाख टन चिकनचे उत्पादन होते. दिवसेंदिवस पोल्ट्रीमध्ये वाढती मागणी होत आहे मात्र पशुखाद्या दरात वाढ होत असल्याने व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
मका, सोयामीलला अधिकचे प्राधान्य :-
पोल्ट्री व्यवसायात पक्ष्यांना खाण्यासाठी मका तसेच सोयमिल चा जास्त प्रमाणत वापर होतो. भारतात महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा राज्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मागील ३ महिन्यांपासून पोल्ट्री खाद्याचे दर प्रति किलो मागे १० रुपये वाढवले आहेत. मका आणि सोयापेंड चे दर वाढले आहेत आणि या खाद्याचा पशूंना वापर केला जात आहे. आता कुठे कोरोना नंतर व्यवसाय सुरळीत चालू आहे तो पर्यंत महागाईला सामोरे जावे लागले आहे.
पशूखाद्याच्या दरवाढीमुळे व्यवसायही बंद :-
दिवसेंदिवस पशुखाद्य दरात वाढच होत चालली आहे त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जर सरकारने तांदूळ आणि गहू पशुखाद्यावर जर अनुदान दिले तर व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो नाहीतर महागाईला कंटाळून व्यवसाय बंद पडतील. मात्र चिकन आणि अंड्याच्या वाढत्या मागणीमुळे दर ही वाढतील असा अंदाज पोल्ट्री उद्योजक विजय जाधव यांनी लावलेला आहे.
Published on: 13 March 2022, 07:56 IST