News

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्यात शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले. त्याला सोयाबीनही अपवाद नाही. सुरुवातीला सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळाला. परंतु नंतर हळूहळू हा दर फारच कमी झाला. सोयाबीन साठी लागलेला उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात असताना वरून पोल्ट्री उद्योगाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे

Updated on 18 November, 2021 10:48 AM IST

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्यात शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले. त्याला सोयाबीनही अपवाद नाही. सुरुवातीला सोयाबीनला  बाजारात चांगला दर मिळाला. परंतु नंतर हळूहळू हा दर फारच कमी झाला. सोयाबीन साठी लागलेला उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात असताना वरून पोल्ट्री उद्योगाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे

सोयाबीनचे दर वाढल्याचीतक्रार करत पोल्ट्री उद्यगानेकेंद्र सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करावा यासाठी साकडे घातले आहे.

 यासंबंधीची माहिती अशी की ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादुर अली यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना एका पत्राद्वारे मागणी केली कि, सोयाबीनला सोयाबीनला 2950 रुपये हमीभाव आहे.मात्र सोयाबीन बाजारात सध्या सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाची याहीवर्षी मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रतिक्विंटल असायला पाहिजेत, म्हणून केंद्र सरकारने सोयाबीनमधील दरवाढ रोखण्यासाठी पावले उचलावीत असे या पत्रात नमूद केले आहे.

 जीएम सोयापेंड आयातीसाठी ही केंद्र सरकारकडे केला होता पाठपुरावा

ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्सअसोसिएशनने यापूर्वीही जीएम सोया पेंडआयातीसाठी ही  केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला होता. या संघटनेच्या असलेल्या लॉबिंग मुळेकेंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीन आयात करण्यास परवानगी दिली होती.तेव्हाही शेतकऱ्यांच्या सोयाबीन बाजारात येण्याचा कालावधी होता तेव्हाच आयात सोयाबीन पेंडभारतात दाखल झाल्यामुळे सोयाबीनचे भाव गडगडले होते.

सध्याचे सोयाबीनचे बाजार भावाची स्थिती पाहिली तर सोयाबीनची आवक न वाढल्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल रोखून धरला तर पुढील काळात सोयाबीनला चांगला दर मिळेल, हे सुत्र पकडूनशेतकरी  व्यवहार करत आहेत. त्यातच पोल्ट्री उद्योगानेआता सरकारदरबारी असलेले आपले वजन खर्च करण्यासाठी कंबर कसली आहे.

English Summary: poultry breeders association demand to soyabioen rate decrease at minister purushotam rupala
Published on: 18 November 2021, 10:48 IST