सध्या तर आपण भाजीपाल्याचा दराचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तयार झालेल्या भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले व या पावसात बराच भाजीपाला हा खराब झाला. त्यामुळे बाजारपेठेत मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन बिघडल्यामुळे भाजीपाला पिकांचे दर चांगले मिळत आहेत.निव्वळ भाजीपालाच नाहीतर कडधान्य वर्गातील उडीद आणि मूग सारखे पिकांना देखील चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
तीच गत कापसाचे देखील राहणार असून कापसाच्या देखील बाजार भाव यावर्षी देखील चांगले राहतील असा एक जाणकारांचा अंदाज आहे. कारण पावसामुळे कापूस पिकाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
एकंदरीत जर आपण पाहिले तर सगळ्याच पिकांना या झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. आपण जर बटाटा या पिकाचा विचार केला तर बटाटा पिकाच्या दरात झालेली वाढ ही साधारणता पश्चिम बंगालमध्ये स्थितीवर जास्त अवलंबून असल्याचे पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा:News: खरिपातील नुकसान भरपाईबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की…
बटाट्याचे पश्चिम बंगाल कनेक्शन
जर आपण बटाटा उत्पादनाचा विचार केला तर देशातील अव्वल क्रमांकावर असलेले पश्चिम बंगाल हे राज्य असून देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल 23 टक्के उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. परंतु पश्चिम बंगालमध्ये यावर्षी बटाट्याचे उत्पादन घटून जर आपण मागच्या वर्षीच्या विचार केला तर त्या तुलनेत 110 लाख टनांवरून 85 लाख टनांपर्यंत उत्पादन आले आहे.
म्हणजेच 25 लाख टन उत्पादनात घट आल्याचे दिसत आहे. यापैकी देखील 61 लाख टन बटाटा गोदामांमध्ये साठवलेला असून त्यापैकी फक्त 32% बाजारात विक्रीसाठी आला आहे.
यावरून एकंदरीत दिसून येते की पश्चिम बंगाल मध्ये बटाट्याचे कमी उत्पादन आणि त्याचे वाढते दर यामुळे बटाट्याची साठेबाजी करण्याकडे कल वाढलेला दिसत आहे.
त्यामुळे देशात अव्वल असलेल्या बटाटा उत्पादक पश्चिम बंगाल मध्येच बटाट्याचे दर वधारले आहेत.जर आपण येथील घाऊक बाजाराचा विचार केला तर ते 23 रुपये प्रति किलोपर्यंत बटाट्याची व्यवहार होताना दिसत असून हे दर मागील वर्षीच्या तुलनेत 60 टक्के अधिक आहे.
याचा थेट परिणाम हा भारतातील पंजाब आणि गुजरात सारख्या बटाटा उत्पादक राज्यांमध्ये देखील बटाट्याचे भाव चांगले आहेत. साधारणतः 15 ते 18 रुपये प्रति किलो हे दर आहे. जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर प्रतिक्विंटल बटाट्याला 1700 ते 2100 रुपये पर्यंत बाजार भाव मिळतोय. बटाट्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे येणारे काही दिवस तरी हे बाजार भाव वाढीव असतील असं या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
नक्की वाचा:मोठी बातमी! जिल्हा बँक राज्य बँकेत होणार विलीन? केंद्र सरकारचे सहकार खाते त्या दिशेने…
Published on: 22 August 2022, 01:24 IST