पोस्ट ऑफिस गुंतवणुकीसाठी अनेक छोट्या-छोट्या योजना देत आहे. या योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर चांगल्या प्रकारचे परतावे आणि करांमध्ये सूटही मिळते. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या या योजनांचा लाभ घेऊन आपण चांगल्या पद्धतीने पैशांची गुंतवणूक करू शकता.
या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या योजनांविषयी माहिती घेऊ.
सीनियर सिटीजन सेविंग अकाउंट
पोस्ट ऑफिस मध्ये वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर 7.4 टक्क्याने व्याज मिळते.यावर मिळणारे व्याजदर दर तीन महिन्यांनी आपल्या खात्यावर जमा होत असते.या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करातही सूट मिळते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना
पोस्ट ऑफिसची आणखी एक योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहे.फिक्स डिपॉझिट सारखी असते.या योजनेवर गुंतवणूक केल्यास कोणताही कर लागत नाही.या योजनेवर 6.8 टक्के व्याज मिळते.पण यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम स्कीम मॅच्युअर झाल्यावर मिळते.त्यावर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करातही सूट मिळते.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट
या पोस्ट ऑफिसच्या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षाचा असतो.या योजनेत किमान दोनशे रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करता येते. या योजनेमध्ये पहिल्या तीन वर्षांसाठी साडेपाच टक्के,आणि पाचव्या वर्षात 6.7 टक्के या दराने व्याज मिळते.या व्याज वार्षिक पद्धतीने मिळते मात्र या योजनांतर्गत तिमाहीच्या आधारावर व्याज मिळते.
किसान विकास पत्र
हे योजना सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी फार उपयुक्त आहे.त्याची सुरुवात हजार रुपये पासून करता येते.ही योजनाही प्रमाणपत्रासाठी असून जे आपण पोस्ट ऑफिस मधून खरेदी करू शकतो.हे बॉण्ड सारख्या प्रमाणपत्राच्या रुपात जारी केले जाते.या योजनेवर सरकारकडून ठराविक पद्धतीने व्याज दिले जाते. सरकार या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याज दर ठरवते. या योजनेअंतर्गत 9वर्ष आणि दोन महिन्यात म्हणजे एकशे दहा महिन्यात आपले पैसे दुप्पट होतील.
Published on: 29 March 2021, 03:52 IST