News

पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याच प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना असतात. त्यामध्ये फिक्स डिपॉझिट तसेच इतर मुदत बचत योजनेचा देखील समावेश होतो. बँकेपेक्षा अधिक व्याज मिळणे ही पोस्ट ऑफिसचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. मग पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आणि फायद्याचे असते.

Updated on 24 February, 2021 4:03 PM IST

 पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याच प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना असतात. त्यामध्ये फिक्स डिपॉझिट तसेच इतर मुदत बचत योजनेचा देखील समावेश होतो. बँकेपेक्षा अधिक व्याज मिळणे ही पोस्ट ऑफिसचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. मग पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आणि फायद्याचे असते.

पोस्ट ऑफिसमध्ये राबवल्या गेलेल्या योजनांमध्ये आपण कोणत्याही जोखमी शिवाय गुंतवणूक करू शकतो. योजनांपैकी पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना बद्दल माहिती घेऊ.

  मंथली इन्कम योजना

 या योजनेअंतर्गत तुम्ही ५ वर्षापर्यंत खाते उघडू शकतात. तेथे मिळणारा व्याजदर हा वार्षिक आधारावर मोजला जातो आणि संबंधित खातेदारास मासिक देयके दिली जातात. या योजनेवरील व्याजदर केंद्र सरकार ठरवत असते. हे व्याजदर ठरवतांना तिमाही पुनरावलोकन चा आधार घेतला जातो.

 

या योजनेमुळे वाढेल कमाई

 या योजनेचे प्रमुख वैशिष्ठ म्हणजे ही योजना महिन्यात रिटर्न देते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्तम योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना निश्चित असे मासिक उत्पन्न मिळते व त्यावर अधिक व्याज देखील मिळते. या योजनेअंतर्गत दोन किंवा तीन व्यक्ती मिळून जॉइंट अकाउंट उघडू शकतात. अशा संयुक्त खात्यांमध्ये सर्व खातेदारांचा समान हिस्सा असतो. तसेच सिंगल खाती संयुक्त खात्यात रूपांतरित करता येतात.या योजनेसाठी १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. एखाद्यामध्ये किमान ठेव मर्यादा १५०० रुपये आहे आणि जास्तीत जास्त आपण ४.५० लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेऊ शकतो. तसेच संयुक्त खाते धारकांची रक्कम मर्यादा ९ लाख रुपयांपर्यंत आहे. या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस संपर्क साधू शकतात.

 

दर महिन्याला कसे पैसे कमवू शकता?

 समजा तुमच्याकडे पाच वर्षाच्या पोस्ट ऑफिस मासिक गुंतवणुकीत ४.५ लाखांची गुंतवणूक केली आहे. या योजनेद्वारे तुम्हाला मिळणारे व्याज ६.६ टक्के आहे. तरी या प्रकरणात तुम्हाला या कालावधीसाठी त्याचे मासिक उत्पन्न २ हजार ४७५ रुपये असेल. म्हणजे तुम्हाला दरमहा २५०० रुपये मिळतील. तसेच मॅच्युरिटी नंतर ५ वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून तुमचे साडेचार लाख रुपये काढून घेऊ शकतात.

 माहिती स्त्रोत-MHlive24.com

English Summary: Post’s Monthly Income Scheme; The central government decides the interest rate
Published on: 20 January 2021, 06:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)