चाळीस झाडांवर एक प्रकारचे फळ शक्य आहे परंतु एका झाडावर चाळीस प्रकारची फळे जरा ऐकायला विचित्र वाटते. ऐकल तर विश्वास बसणार नाही.परंतु कृषी क्षेत्रामध्ये आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानमुळे हे शक्य झाले आहे. हे शक्य करून दाखवले अमेरिका येथील सेरा क्यूज विश्वविद्यालयातीलविस्युअलआर्ट्सचे प्रोफेसर सॅम वॉन ऐकेन यांनी.
ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी हे करून दाखवले आहे. विशेष म्हणजे या झाडाला पल्लवीत होण्यासाठी जवळ नऊ वर्षांचा वेळ लागला आहे. या झाडाचे नाव आहे ट्री ऑफ 40,या झाडाबद्दल या लेखात माहिती पाहू.
या झाडावर जवळजवळ चाळीस प्रकारची फळे लागतात. त्या फळांमध्ये आंबा, पेरू, जांभूळ,केळी तसेच सफरचंद इत्यादी फळांचा समावेश आहे. त्यांनी या झाडावर जवळजवळ 2008 सालीकाम सुरू केलं आता ते फळांनी बहरू लागले आहे.
- या झाडाची एक फांदी ची किमतीचा विचार केला तर विश्वास बसणार नाही. या झाडाची एक फांदी ची किंमत तब्बल 19 लाख रुपये आहे.या एकाफांदीच्यासहाय्याने तुम्ही या झाडाची लागवड करू शकता.या फांदीच्याच्या माध्यमातून हळूहळू बाग तयार केला तर या बागेतून तब्बल 40 फळांचे उत्पन्न एकाच वेळी घेता येऊ शकेल.
यासाठी प्रोफेसर सॅम यांनी बगीचा घेतला भाड्याने
अमेरिकेमध्ये स्थित ज्या बागांमध्ये हे झाड आहे, त्या बागाला भाड्यावर घेतल गेल आहे.
अगोदर हा बाग2008 मध्ये न्यूयॉर्क राज्य कृषी प्रयोग शाळेच्या मालकीचा होता.यामध्ये फळाच्या विविध जाती होत्या.परंतु निधीअभावी हा बागबंद करण्याची वेळ आली होती अशावेळी प्रोफेसरसॅमयांनी या बंद होणाऱ्या बाग भाड्याने घेऊन स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर ट्री ऑफ 40 हे झाड यशस्वी करून दाखवले.
Published on: 16 September 2021, 08:02 IST