News

राज्यातील तापमान वाढत असून अनेक भागातील तापमानाचा पारा ३६ अंशांच्यावरती आहे. उन्हाचा चटका वाढलेला असतानाच राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक हवाामान तयार होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागे वर्तवली आहे.

Updated on 10 April, 2020 1:06 PM IST


राज्यातील तापमान वाढत असून अनेक भागातील तापमानाचा पारा ३६ अंशांच्यावरती आहे.  उन्हाचा चटका वाढलेला असतानाच राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक हवाामान तयार होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागे वर्तवली आहे. 

राज्यातील तापमान वाढलेले असतानाच पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. गुरुवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भातील तापमानात थोडीशी घट झाल्याचे दिसून आले.  गुजरात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रतही तापमानात घट झालेली वाढ कायम राहणार आहे.  गुरुवारी सकाळपर्यतच्या २४ तासांमध्ये मालेगवा येथे सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी ४१.६ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.   दरमयान मध्य प्रदेश आणि विदर्भ परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यापासून दक्षिण तामिळनाडूपर्यत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत असून आजपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान देशातील इतर राज्यातही पावसाचा अंदाज आहे.  हिमालयीन भागात येत्या २४ तासात पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते. यासह पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली,  राजस्थान येथेही पुढील २४ तासात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा वाढत आहे. ढगाळ वातावरण असताना देखील तेथील तापमान वाढलेले आहे. १५ एप्रिलला दिल्लीतील तापमान ४० अशं सेल्सिअस पर्यंत पोहचेल असा अंदाज वर्तवण्य़ात आली आहे.

गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांमध्ये  राज्यातील विविध भागातील तापमान  पुढील प्रमाणे - पुणे ३५.९, जळगाव ३८.६, कोल्हापूर३५.९, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४१.६ , नाशिक ३४.३, निफाड ३४.५, सांगली ३६.०, सातारा ३६.१, डहाणू ३२.५, सोलापूर ३९.१, सांताक्रुझ ३२.१, रत्नागिरी ३३.४, औरंगाबाद ३६.६, परभणी ३९.१, नांदेड ३९.५, अकोला ४०.२, अमरावती ४.०, बुलडाणा ३६.८, ब्रह्मपुरी ३९.६,. गोंदिया ३८.२, नागपूर ३९.७, वर्धा ३९.५

English Summary: possibility of rain today in state
Published on: 10 April 2020, 01:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)