News

जर आपण जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर जागतिक बाजारपेठेत 1994 व 2011 नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवायला येत आहे. याच कारणामुळे चालू वर्षी भारतात कापसाचे दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक करण्याची शक्यता शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तवली आहे.

Updated on 13 October, 2021 11:00 AM IST

 जर आपण जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर जागतिक बाजारपेठेत 1994 व 2011 नंतर पहिल्यांदाच कापसात तेजी अनुभवायला येत आहे. याच कारणामुळे चालू वर्षी भारतात कापसाचे दर सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक करण्याची शक्यता शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी वर्तवली आहे.

 1994 व यावर्षी जागतिक बाजारात एक पौंड रुईचा दर एक डॉलर प्रति 10 सेंट प्रति पाऊंड होता. 2011साली तो विक्रमी $12 14 सेंट प्रतिपौडाच्या दरा पर्यंत पोहोचला. वर्षे 1995 नंतर जागतिक बाजारात कापसाच्या दरात मंदीहोती व ती 40 सेंट  प्रति पाउंडपर्यंत खाली घसरली होती. त्याच कारणामुळे 1997 ते 2003 पर्यंत भारतात 110 लक्ष कापूस गाठी चे आयात झाली होती. त्यानंतर हे दर 2019 पर्यंत 70 सेंट ते एक डॉलर प्रति पाऊंड दरम्यान राहिले. 1994 मध्ये डॉलरचा विनिमय दर 33 ते 34 रुपये असा होता. म्हणून भारतात कापसाचे दर 2500 रुपये प्रति क्विंटल होते. 2011साली देखील एक डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरात जास्त अंतर नव्हते.

त्यावेळी विनिमय दर 55 रुपये होता. त्याचा परिणाम देखील कापसात तेजी अनुभवण्यातआली. सहा हजार ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत कापसाचे दर 2011 मध्ये पोहोचले होते.

 याबाबत बोलताना विजय जावंधिया म्हणाले, कापसातील तेजी ही तीन कृषी कायद्यांच्या परिणामी आल्याचा भ्रम निर्माण केला जात आहे. मात्र तसं काहीही नसून जागतिक बाजारात  कापसाची आवक कमी असल्याने दरातील ही तेजी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन हेदेखील एक कारण त्यामध्ये आहे. असे त्यांनी म्हटले आहे. सात हजार रुपये  क्विंटल पेक्षा अधिक सादर कापूस उत्पादकांना मिळेल असा दावा विजय जावंधिया यांनी केला आहे.

काय आहे कापसाचे गणित?

  • एक क्विंटल कापसापासून 34 किलोरुईव 64 किलोसरकीमिळते.

 

  • $1 15 सेंट एक पाउंड परळी चा भाव ( 187 किलो रुई )
  • 34 किलो रुईचे (187×34)=6363
  • 64 किलो सरकीचे 30 रुपये प्रति किलो प्रमाणे 1920 रुपये
  • एक क्विंटल कापसाचे 6363 अधिक 1920 म्हणजेच 8250 एकूण
  • प्रक्रिया खर्च व्यापारी नफा 1250 रुपये वजा केले तर सात हजार रुपये होतात.

( स्त्रोत- हॅलो कृषी)

English Summary: possibility of cotton rate https://marathi.krishijagran.com/umbraco/#tab32fast in coming few days
Published on: 13 October 2021, 11:00 IST