राज्यात सध्या नवीन सरकार स्थापन झाले असून अनेक घडामोडी सध्या राज्यात घडत आहेत. असे असताना विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांमध्ये चार नावं आघाडीवर आहेत. आघाडीमधील तीन्ही पक्षांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेता त्यांचाच असणार आहे. यामुळे कोणाची वर्णी यासाठी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीमध्ये या पदासाठी 4 नावावर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे या नावांचा समावेश आहे. असे असताना अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज अजित पवार यांच्या नावावर होणार शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. यामुळे काही वेळेतच याबाबत घोषणा केली जाऊ शकते.
याबाबत अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार आहेत. दरम्यान, पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शीरगणती करण्यात आली. शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केला. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं मिळाली त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शरद पवारांना मोठा धक्का! सरकार बदलताच पवार अध्यक्ष असलेली परिषद बरखास्त
दरम्यान, आज बहुमत चाचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली ताकद सिद्ध करायची आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आज सगळे चित्र स्पष्ठ होणार आहे, यामुळे याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यानंतर मंत्रीमंडळ स्थापन होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
रिकाम्या पोटी नारळपाणी पिल्याने शरीरावर होतात हे परिणाम, जाणून घ्या, होईल फायदा...
भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...
गुवाहाटीत हॉटेलमध्ये आमदारांचा खर्च नेमका झाला तरी किती, डोळे पांढरे करणारी आकडेवारी आली समोर..
Published on: 04 July 2022, 11:24 IST