News

हवामान बदल, ढगाळ वातावरण व या सगळ्या परिस्थितीमुळे डाळिंब बागांवर पडणाऱ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या सगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या बागा मोठ्या संकटात आहे

Updated on 07 February, 2022 2:35 PM IST

हवामान बदल, ढगाळ वातावरण व या सगळ्या परिस्थितीमुळे डाळिंब बागांवर पडणाऱ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या सगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या बागा मोठ्या संकटात आहे

सध्या डाळिंब बागांवर होल बोरर आणि पिन बोरर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या संकटामध्ये सापडलेल्यांना बागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारने  डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काही तांत्रिक मदत करावी व त्यासोबतच नुकसान त्यासाठी देखील मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे महाराष्ट्राचे डाळिंब उत्पादक खान च्या वतीने खासदार डॉ.विकास महात्मे आणि मोर्चाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन केली.

त्यानंतर केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांना महाराष्ट्रातील डाळिंबपिकावरील आलेल्या मर रोगाच्या समस्येची त्यासोबतच शेतकऱ्यांना काय मदत करता येईल यासंबंधी तात्काळ एक शिष्टमंडळ पाठवून पाहणी करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. या किडीच्या प्रादुर्भावामुळे आणि मर रोगामुळे डाळिंबाच्या बागा संपत आहेत. जवळ जवळ महाराष्ट्रातील 40 हजार हेक्‍टर क्षेत्र या किडींच्या प्रादुर्भावामुळे संपले असून आणि जवळ जवळ 80 हजार हेक्‍टरवरील क्षेत्राला या किडींची लागण झाली आहे.याकिडींवर नियंत्रण मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

यासाठी राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना यासाठी मदत करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांना शिष्टमंडळाने सांगितले. केंद्रीय पथकाच्या पाहणी नंतर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे व नुकसानीची तीव्रता बघून काय मदत करता येईल याबाबत विचार केला जाईल असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. यावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी डाळिंबावरील संकटाची दखल घेऊन कृषी सचिव संजय अग्रवाल यांना केंद्रीय पथक पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

English Summary: pomegranet productive farmer deligation meet to central agri minister to tomar
Published on: 07 February 2022, 02:35 IST