News

महाराष्ट्रामध्ये डाळिंब लागवड फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे.आधीच महाराष्ट्रातील डाळिंबाचे उत्पादन हे घटले असताना त्यातल्या त्यात गुजरात आणि राजस्थान मधून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे

Updated on 30 December, 2021 6:51 PM IST

महाराष्ट्रामध्ये डाळिंब लागवड फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे.आधीच  महाराष्ट्रातील डाळिंबाचे उत्पादन हे घटले असताना त्यातल्या त्यात गुजरात आणि राजस्थान मधून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे

त्यामुळे स्थानिक उत्पादकांना डाळिंब दरामध्ये मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जर देशाचा विचार केला तर 80 हजार हेक्‍टरवर डाळिंबाचा मृग बहार धरला जातो. या भागातील 70 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे.

 यावर्षी सुरुवातीला डाळिंबाला 30 ते 40 रुपये किलो असा दर मिळाला होता परंतु कालांतराने गुजरात आणि राजस्थान मधून डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.

सध्या डाळिंबाला प्रति किलो 60 ते 100 रुपये असा दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या काही वर्षांपासून डाळिंब लागवड क्षेत्रात वाढ झाल्यामुळे त्यातच या भागात कमीत कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा फायदा डाळिंब पिकाला झाला आहे. 

त्यामुळे तेथील पीक देखील चांगले राहिले आहे. या दोन्ही राज्यातील डाळिंबाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे तेथील डाळिंब महाराष्ट्राचा अन्य राज्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहेत. या वाढलेल्या डाळिंब च्या आवकेमुळे स्थानिक डाळिंब दरावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

English Summary: pomegranet market rate decrease due to huge sully of pomegranet through rajasthan and gujraat
Published on: 30 December 2021, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)