राज्यात डाळिंब लागवड लक्षणीय बघायला मिळते (Pomegranate cultivation is significant in the state), राज्यातील पश्चिम भागात डाळिंबाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात देखील डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोलापूर मधील सांगोला डाळिंबाच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या डाळिंबाच्या उत्पादनामुळे सांगोला तालुक्याला डाळींबाचे आगार म्हणून संबोधले जाते (Sangola taluka is known as a pomegranate depot).
सांगोल्याच्या डाळिंबाची बाजारात मोठी मागणी बघायला मिळते. मात्र या डाळिंबाच्या आगारालाच आता मर रोग आणि पिन होल बोररचे ग्रहण लागलेले दिसत आहे. या परिसरातील डाळिंबाच्या बागा मररोगामुळे आणि पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहेत. जर या रोगांचे असेच सावट अजून काही काळ बरकरार राहिले तर सांगोलाची डाळिंब आगार म्हणून असलेली ख्याती नामशेष होऊन जाईल अशी भीती जाणकार लोक व्यक्त करत आहेत.
पूर्वी सांगोला ची ओळख विशेषतः दुष्काळामुळे होत असे, सांगोला तालुक्यात भयान दुष्काळ असल्यामुळे हा तालुका नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते मात्र गेल्या काही दशकापासून या तालुक्यात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आणि डाळिंब उत्पादनामुळे (Due to pomegranate production) या परिसरातील शेतकरी सधन झालेत आणि डाळिंब उत्पादनामुळे दुष्काळासाठी कुख्यात असलेला सांगोला डाळींबाचे आगार म्हणून विख्यात झाला.
पूर्वी असे सांगितले जात होते की सांगोल्याच्या शेतजमिनीवर कुसळ सोडून दुसरे काही उगुच शकत नाही, मात्र येथील शेतकऱ्यांनी सांगोल्याला लागलेली ही काळीमा पुसून टाकली आणि डाळिंब उत्पादनात सांगोल्याचे नाव शीर्षस्थानी नेऊन ठेवले. सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी अफाट हाल-अपेष्टा सहन करून आपले नाव संपुर्ण पंचक्रोशीत नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजवले. सांगोल्यातील डाळिंब विशेषता त्याच्या दर्जेदार कॉलिटी मुळे विख्यात आहेत येथील डाळिंब निर्यातक्षम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डाळिंब व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावरच डाळिंब खरेदी करण्यासाठी येऊ लागले. गेल्या काही वर्षात या तालुक्याचे डाळिंब एक मुख्य पीक बनले आणि येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण डाळिंबावर अवलंबून झाले.
या तालुक्यात डाळिंब उत्पादनामुळे फक्त शेतकऱ्यांचा फायदा झाला असे नव्हे तर यामुळे विविध उद्योगधंद्याला तालुक्यात चालना मिळाली एकंदरीत डाळींबा मुळे सांगोला तालुक्याचा नक्षाच बदलला. मात्र असे असले तरी सांगोला तालुक्यात मर रोग आणि पिन होल बोरर या किडीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील डाळिंबाच्या बागा कमालीच्या कमी होताना दिसत आहेत. आणि याचा सरळ परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दिसून येणार आहे शिवाय यामुळे तालुक्याचे अर्थकारण डगमगणार एवढे नक्की.
Published on: 04 January 2022, 10:01 IST