News

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यात थंडीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, संपूर्ण राज्यात शीतलहरीचा कहर अद्यापही कायम आहे. या शीतलहरचा फटका सर्वात जास्त फळ बाग पिकांना बसताना दिसत आहे. वाढलेल्या थंडीमुळे फळबागा जणूकाही गारठुनच गेली आहेत. नववर्षाचा पहिल्याच महिन्यात तापमानात कमालीची घट झाली आहे.

Updated on 16 January, 2022 2:28 PM IST

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यात थंडीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, संपूर्ण राज्यात शीतलहरीचा कहर अद्यापही कायम आहे. या शीतलहरचा फटका सर्वात जास्त फळ बाग पिकांना बसताना दिसत आहे. वाढलेल्या थंडीमुळे फळबागा जणूकाही गारठुनच गेली आहेत. नववर्षाचा पहिल्याच महिन्यात तापमानात कमालीची घट झाली आहे.

तापमानात घट झाल्यामुळे फळबाग पिकांसमवेतच भाजीपाला पिकांना देखील मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सुरू असलेल्या शीतलहर मुळे डाळिंब, द्राक्ष, केळी या पिकांची वाढ जणू काही खुंटली आहे. थंडीचा तडाखा हा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जास्त प्रकर्षाने जाणवून येत आहे. जिल्ह्यातील फळबागा थंडीमुळे मोठ्या प्रभावित झाल्या असून त्यामुळे प्रतिकूल परिणाम नजरेस पडत आहेत. सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या थंडीच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील फळबाग पिकांचे उत्पादनात कमालीची घट घडून येण्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी, या थंडीचा काही सकारात्मक परिणाम देखील नजरेस पडत आहे सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या शितल लहरीमुळे रब्बी हंगामातील पिके फुल्टू जोमात आहेत. आणि त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या शितलहरीमुळे "कही खुशी तो कही गम" अशी परिस्थिती नजरेस पडत आहे. मात्र असे असले तरी थंडीचा तडाखा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार एवढे नक्की.

सांगलीमध्ये नववर्षाची सुरूवातच थंडीच्या आगमनाने झाली. सायंकाळी 6च्या सुमारास पडणारी थंडी दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत हाहाकार माजवत असते. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच सांगली जिल्हा थंडीमुळे पूर्णतः गारठलेला आहे. थंडी समवेतच जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण कायम आहे त्यामुळे बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. आधीच सांगली जिल्ह्यासमवेतच राज्यातील बळीराजा निसर्गाच्या लहरीपणामुळे अक्षरशा नैराश्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आणि त्यात आता ही वाढती थंडी आणि ढगाळ वातावरण शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखी ठरत आहे. सांगली जिल्ह्यात तयार झालेल्या दूषित वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे सावट नजरेस पडत आहे, तसेच या रोगांवर लवकर नियंत्रण देखील या बदलत्या वातावरणामुळे मिळवता येणे शक्य नाही. सांगली जिल्हा डाळिंब द्राक्षे केळी या फळबाग पिकांसाठी व भाजीपाला पिकांसाठी विशेष ओळखला जातो. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात सुरु असलेल्या थंडीच्या लाटेमुळे बहरात असलेल्‍या द्राक्षबागावर प्रतिकूल परिणाम नजरेस पडत आहे. या थंडीमुळे फळांची वाढ खुंटली असून त्यामुळे उत्पादनात घट होणार व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार एवढे नक्की. जिल्ह्यातील काही भागात द्राक्ष पीक काढणीसाठी तयार आहे, त्यामुळे अशा भागातील द्राक्ष बागांवर रोगराई वर नियंत्रण ठेवण्यासाठी हजारो रुपयांची महागडे औषधी फवारण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर नामुष्की ओढवून आली आहे, यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे बाजारात द्राक्षे ला पाहिजे तेवढी मागणी नसल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्षांना कवडीमोल दर प्राप्त होत असल्याचे समजत आहे. एकंदरीत बनलेल्या समीकरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी समवेतच डाळिंब उत्पादक शेतकरी व भाजीपाला पिकवणारे शेतकरी पुरते संकटात सापडल्याचे समजत आहे.

English Summary: pomegranate grapes and vegetables get damaged by cold wave
Published on: 16 January 2022, 02:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)