गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरु आहे. याबाबत रोज नवनवीन वक्तव्ये पुढे येत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत एक मोठे विधान केले. त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटताना दिसत आहेत. ठाण्यामध्ये मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी याबाबत एक पोस्टर त्यांच्या कार्यालयाबाहेर लावला. जो राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.
याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये आमच्या धर्मवीरांचे काय झाले? घात झाला की अपघात? लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे, असे यावर लिहिले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. आनंद दिघेंसोबत जे घडलं ते मला माहित आहे. मी जर त्याबाबत मुलाखत दिली, तर महाराष्ट्रात भूकंप येईल, असे मुख्यमंत्र्यानी म्हटले होते.
तेव्हापासून याबाबत उलटसुलट वक्तव्ये केली जात होती. आनंद दिघेसाहेबांचे शिष्य म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काम केले आहे. मग दिघे साहेबांचे निधन कसे झाले? याची खरी माहिती बाहेर येण्यासाठी एवढे दिवस का लागतात? ती माहिती जाणून घेण्यास आम्ही पण आता उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी महेश कदम यांनी दिली.
राज्यातील बड्या राजकीय नेत्यांना धक्का, साखर आयुक्तांनी पैसे थकवल्याप्रकरणी दिल्या नोटीस..
या घटनेसंदर्भातील सत्यता काय? याबाबत सर्व बाजूंनी त्यांना विचारणा होऊ शकते, असे बोलले जाते. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत अजून माहिती पुढे येऊ शकते. ठाणेकरांसाठी देवमाणूस असणाऱ्या आनंद दिघे यांचे गाडी अपघातामुळे निधन झाले होते. यामुळे ते नेमकं कसे झाले होते. असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या;
संजय राऊत यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे गरजले, म्हणाले पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ...
संजय राऊतांच्या अटकेनंतर घरात सापडली तब्बल 'इतकी' रक्कम, कागदपत्रेही नाहीत..
लाखोंचा पोशिंदा अडचणीत, नियम बाजूला ठेवून मदत करा, आता करायचे काय अजितदादांनी दिला सल्ला
Published on: 01 August 2022, 03:43 IST