गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत राजकीय अस्थिरता आली आहे. देशाचे राष्ट्रपती देश सोडून पळून गेले आहेत. असे असताना आता श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी राजकीय नेते दिनेश गुणवर्देना यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज कोलंबो येथील फ्लॉवर रोडवरील पंतप्रधान कार्यालयात नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यामुळे आता ते देशाची आर्थिक स्थिती पुन्हा पूर्वपदावर आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच रानिल विक्रमसिंघे यांनी नुकताच राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यापुढे आता अनेक आव्हाने आहेत. पंतप्रधानपदी निवड झालेले श्रीलंकेच्या राजकारणातील दिग्गज म्हणून गुणवर्देना यांना ओळखले जाते. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. यामुळे त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे.
तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी एप्रिलमध्ये त्यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. यामुळे आता देशाचे वातावरण स्थिर करणे, महागाई, रोजगार असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे आहेत. अनेक महिलांवर दोन वेळच्या अन्नासाठी शरीरविक्रीची वेळ आली आहे. यावरून देशाच्या परिस्थितीचा अंदाज आपल्याला लावता येईल.
अमित शहांच्या सहकार मंत्राल्यास शरद पवार करणार मार्गदर्शन, सरकार मंत्रालयाने केलेली विनंती
दिनेश गुणवर्दे यांच्या कुटुंबाचा भारताशी सखोल संबंध आहे. गुणवर्धनेचे वडील फिलिप गुणवर्धने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. युनायटेड स्टेट्स आणि नेदरलँड्समध्ये शिक्षण घेतलेले, दिनेश गुणवर्धने हे त्यांचे वडील फिलिप गुणवर्धने यांच्याप्रमाणेच ट्रेड युनियनचे नेते आणि एक प्रखर सेनानी आहेत. यामुळे आपल्या देशाची संबंध चांगले राहतील अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! प्रसिध्द बांधकाम व्यावयसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर
दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, एकमेकांवर बॉम्ब फेकले, राजकीय वातावरण तापले..
एक नंबर! अवघ्या २९९ रुपयांत तब्बल १० लाखांचा विमा, वाचा सविस्तर..
Published on: 22 July 2022, 12:39 IST