News

भारतीय विमा महामंडळ अर्थात एलआयसी सगळ्या वयोगटांच्या व्यक्तींसाठी वेगळ्या प्रकारची आणि आकर्षक योजना आणत असते. एलआयसीने आता नुकतीच आणलेली बचत प्लस योजना ही एक अ संबंधित, सहभागत्मक आणि वैयक्तिक बचत योजना आहे.

Updated on 18 March, 2021 3:32 PM IST

भारतीय विमा महामंडळ अर्थात एलआयसी सगळ्या वयोगटांच्या व्यक्तींसाठी वेगळ्या प्रकारची आणि आकर्षक योजना आणत  असते.  एलआयसीने आता नुकतीच आणलेली बचत प्लस योजना ही एक अ संबंधित,  सहभागत्मक आणि वैयक्तिक बचत योजना आहे.

या योजनेद्वारे तुम्हाला संरक्षण आणि बचत यांचे व्यवस्थित संयोजन करता येते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना परिपक्व होण्यापूर्वी कोणत्याही वेळी मृत पॉलिसी धारकाच्या कुटुंबास आर्थिक मदत पुरवते आणि परिपक्वतेच्या वेळी हयात असलेल्या पॉलिसी धारकांना एकरकमी रक्कम प्रदान करते. या योजनेत प्रस्तावित एकरकमी किंवा पाच वर्षाच्या मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरू शकतो. की योजना खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑफलाईन इंटरमीडिएट संस्थांद्वारे किंवा थेट वेबसाईटद्वारे खरेदी करू शकतात.

 

बचत प्लस योजनेची वैशिष्ट्ये

 बचत प्लस योजनेअंतर्गत प्रत्येक प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट अंतर्गत उपलब्ध असलेल्या दोन पर्यायानुसार मृत्यूच्या वेळी विम्याची रक्कम निवडण्याचा पर्याय आहे. यामध्ये किमान एक लाख रुपयांचे धोरण घेतले जाऊ शकते. यामध्ये जास्तीत जास्त रकमेची मर्यादा नाही. तसेच बचत प्लस योजनेत गुंतवणूक केल्यास पॉलिसीधारक या योजनेत गरज असली तर कर्ज घेऊ शकतात.

 

प्रीमियम पेमेंटच्या दोन्ही माध्यमांसाठी उच्च मूलभूत रकमेची सूट दिली जाते. या पॉलिसीची मुदत ही पॉलिसी धारकाचे वय आणि परिपक्वता वय  इत्यादीसाठी पात्रता अटी आणि त्यानुसार निवडलेला पर्याय नुसार असेल.

English Summary: Policy holder’s nominee get money before maturity
Published on: 18 March 2021, 03:21 IST