News

हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने (Farmer) थेट पोलिसात तक्रार (Police Complaint) दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. सेनगाव तालुक्यातील माझोड येथील दशरथ गजानन मुळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मात्र ही तक्रार कशासाठी दाखल केली आहे, यावरून याची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Updated on 30 December, 2022 5:28 PM IST

हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने (Farmer) थेट पोलिसात तक्रार (Police Complaint) दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. सेनगाव तालुक्यातील माझोड येथील दशरथ गजानन मुळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मात्र ही तक्रार कशासाठी दाखल केली आहे, यावरून याची चांगलीच चर्चा सुरु आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थकीत वीज बिलासाठी (Electricity Bill) वीज तोडू नये, अशा सूचना देऊनही माझी वीज तोडण्यात आली आहे. असा आरोप केला गेला आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा भागात वीज पुरवठा खंडित करू नये व सक्तीची वीज बिल वसुली करू नये.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र तरीही वीज वितरण कंपनीने माझा वीज पुरवठा खंडित केला. माझीच नव्हे, इतर अनेकांची वीज कापली. असल्याचा आरोप करत मुळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मला अतिवृष्टीच्या मदतीची मिळालेली रक्कम बिलापोटी भरावी लागली. यासाठी महावितरणने दादागिरीची भूमिका घेतली होती.

ऑस्ट्रेलियातून ५१ हजार टन कापूस आयात, शेतकऱ्यांसह संघटनांनी संताप व्यक्त, आयात शुल्कही माफ

यातून उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर अन्यथा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे गोरेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मुळे यांनी म्हटले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. शेतकरी रब्बीची लागवड करत असतानाच महावितरणकडून थकीत वीज बिलसाठी थेट वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.

'मुकादम एका कारखान्याची ॲडव्हान्स बुडवून दुसऱ्या कारखान्याकडे जातो, तिथे अर्धे काम करून तिसऱ्याकडे जातो'

त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. चालू महिन्याचे बिल भरलेल्या अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट न करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्यांचे आदेश पाळले जात नाहीत, यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
29 गुंठ्यांत 3 लाखांचा नफा! काकडीची शेती ठरली फायद्याची
'आता प्राण्यांच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम दुप्पट करणार'
महावितरणची नवीन शाळा! ट्रान्सफॉर्मर बदलायचाय मग वीज बिल भरा..

English Summary: Police Hingoli , Deputy Chief Minister Complaint
Published on: 30 December 2022, 05:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)