News

सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी, बुलडाणा जिल्ह्यात दि. 20 रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा पार पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर आज बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांना अटक केली आहे.

Updated on 25 November, 2023 4:44 PM IST

सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी, बुलडाणा जिल्ह्यात दि. 20 रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा पार पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर आज बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांना अटक केली आहे.

पिवळा मोझॅक, बोंड अळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रतीएकर १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२ हजार ५०० रुपयांचा भाव गरजेचा आहे. शासनानं कोणतीही अट न ठेवता संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशीही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.यासंदर्भात सरकारनं आठ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा २९ नोव्हेंबरला आम्ही मंत्रालय ताब्यात घेऊ, असा इशारा तुपकरांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर, बुलडाणा पोलीसांनी रविकांत तुपकर यांनी कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली होती.
यावर प्रतिक्रिया देताना, अशा नोटीसांना मी भीक घालत नाही, शेतकऱ्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा होत असेल तर तो आम्ही कायम करणार.पोलीसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये,आंदोलनात आम्ही शहिद होण्याची तयारी आहे. मंत्रालय कोणाची प्रोपर्टी नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर 29 नोव्हेंबरला आम्ही मंत्रालयाचा ताबा घेणार म्हणजे घेणारच असा इशारा
तुपकर यांनी दिला होता. त्यामुळे रविकांत तुपकर यांना पोलीसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. तुपकर यांच्या अटकेने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

English Summary: Police detained Ravikant Tupkar; Activists are aggressive
Published on: 25 November 2023, 04:44 IST