News

यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे, सरकारचे धोरण आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी मुळे गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Updated on 05 December, 2021 3:15 PM IST

यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे, सरकारचे धोरण आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी मुळे गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

. मजुरांअभावी जिल्ह्यातील कापूस वेचणी अद्याप झालेली नाही. अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे वावरातील कापूस गळून पडत आहे. त्यामुळे शेतकरी मोठा संकटात सापडला आहे शेतकऱ्यांचे हेच दुःख जाणून पोलिसांनी एका शेतकऱ्याला कापूस वेचणी करण्यास मदत केली आहे. पोलिसांनी कापूस वेचणी करून कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक देखील केली आहे. हे कौतुकास्पद कार्य रेगुंठा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी केले. त्यांच्या या कार्याचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.

 यावर्षी सुरुवातीला पावसाने बरसन्यास थोडा उशीरच केला, त्यामुळे खरीप हंगामातील कापूस वेचणी अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणून मजुरांची टंचाई जिल्ह्यात भासत आहे, त्यामुळे कापूस वेचणी वेळेवर होत नाहीय, त्यातच अवकाळी पाऊस आणि हवामानाच्या बदलामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे,  ह्याच अडचणी लक्षात घेऊन रेगुंठा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्याला कापूस वेचणी करण्यास मदत केली.

जर वेळेवर कापूस वेचणी झाली नाही तर कापसाचे खुप मोठे नुकसान होते, म्हणुन जिल्ह्यातील शेतकरी 20 रुपये किलोने कापुस वेचणीसाठी मजूर लावत आहे, तरी देखील शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही, म्हणून वावरात उभे असलेले कपाशी पीक हवामान बदलामुळे प्रभावित होत आहे आणि कापसाच्या उत्पादनात घट घडून येत आहे. म्हणुन कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, आणि वेळेवर शेतकऱ्यांची कापूस वेचणी व्हावी यासाठी रेगुंठा पोलीस ठाण्यातील 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एका शेतकऱ्याचे 2 एकरातील पांढरे सोने वेचणी केले. पोलिसांनी जवळपास एका दिवसात 4 क्विंटल कापुस वेचणी केला.

पोलिसांनी केलेला या कार्याची सोशियल मिडियामध्ये खुपच चर्चा होत आहे. हे कार्य करून पोलिसांनी जय जवान जय किसान हि घोषणा प्रत्येक्षात उतरवली आहे. पोलिसांच्या ह्या कामामुळे पोलीसांचे मुर्दू रूप जगासमोर आले आहे, पोलीस फक्त आपल्याला सुरक्षाच प्रदान करत नाही तर वेळेप्रसंगी असे कार्य करून समाजाला एक नवीन दिशा सुद्धा दाखवतात हे यातून स्पष्ट झाले आहे. म्हणून सोशियल मिडियावर लोक जय जवान जय किसान असे म्हणतं पोलिसांचे आणि शेतकऱ्यांचे महत्व अधोरेखित करत आहेत.

English Summary: police cop help to farmer for cotten work this police cop in rengutha police station
Published on: 05 December 2021, 03:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)