News

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने मध्ये मराठवाडा आणि विदर्भातील 36 कृषी उपविभागातील 2.33 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 966.30 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला असून त्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. मुंबईच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने सुरु तयारकेलेल्या परफॉर्मन्स निर्देशांकात प्रथम वैजापूर, द्वितीय क्रमांक हा सिल्लोड तर तृतीय क्रमांक हिंगोली उपविभाग ने मिळवला आहे.

Updated on 21 June, 2021 9:58 PM IST

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना होत असलेल्या हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे तसेच शेतीसाठी सहाय्य करण्यासाठीहाती घेण्यात आली आहे.महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 36 कृषी उपविभागातील पाच हजार 142 गावांमधूनही योजना राबवली जात आहे.या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेततळे, ठिबक, तुषार यासारख्या सिंचनाच्या साधनांसह  योजने सोबतच सार्वजनिक शेततळे, मृद व जलसंधारणाची कामे व इतर योजनांचा समावेश आहे.

 या योजनेमध्ये क्रमांकानुसार असलेले कृषी उपविभाग

  • वैजापूर
  • सिल्लोड
  • हिंगोली
  • पुसद
  • उस्मानाबाद
  • परतुर
  • वर्धा
  • यवतमाळ
  • हिंगणघाट
  • औरंगाबाद

अकराव्या क्रमांकावर लातूर, बाराव्या क्रमांकावर मोर्शी, 13 व्या क्रमांकावर पाचोरा, चौदाव्या क्रमांकावर जालना, 15 व्या क्रमांकावर परभणी, 16 व्या क्रमांकावर उदगीर, 17 व्या क्रमांकावर वाशिम, 18 व्या क्रमांकावर अकोला, 19 व्या क्रमांकावर दारव्हा, 20 व्या क्रमांकावर भूम,

21 व्या क्रमांकावर अकोट, 22 व्या क्रमांकावर पांढरकवडा, तेविसाव्या क्रमांकावर अमळनेर, 24 व्या क्रमांकावर बुलढाणा, 25 व्या क्रमांकावर अंबाजोगाई, 26 व्या क्रमांकावर आर्मी, 27 व्या क्रमांकावर अमरावती, 28 व्या क्रमांकावर जळगाव, 29 व्या क्रमांकावर मेहकर, तिसाव्या क्रमांकावर बीड, 31 व्या क्रमांकावर माजलगाव, 32 व्या क्रमांकावर नांदेड, 33 व्या क्रमांकावर अचलपूर, 34 व्या क्रमांकावर किनवट, 35 व्या क्रमांकावर देगलूर तर खामगाव कृषी उपविभाग 36 व्या क्रमांकावर आहे.

English Summary: pokhara yojna
Published on: 21 June 2021, 09:58 IST