News

ऑगस्ट महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि व्यवहारावर होणार आहे. त्यामुळे याविषयी माहिती माहीत असणे गरजेचे आहे. म्हणून पुढील महिन्यापासून होणाऱ्या बदलांची आपण सविस्तर माहिती करून घेऊया.

Updated on 31 July, 2022 11:37 AM IST

ऑगस्ट (august) महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि व्यवहारावर होणार आहे. त्यामुळे याविषयी माहिती माहीत असणे गरजेचे आहे. म्हणून पुढील महिन्यापासून होणाऱ्या बदलांची आपण सविस्तर माहिती करून घेऊया.

1) शेतकरी सन्मान निधी योजने संदर्भात

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचं आहे. असं न केल्यास शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतील १२ वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळील सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी (E-KYC) करून घ्या.

शेतकरी स्वतः संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन केवायसी (Online KYC) प्रक्रिया पूर्ण करू शकतील. १ ऑगस्टपासून शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकरी केवायसी करू शकणार नाही.

हे ही वाचा 
Land Aadhaar Card: आता जमिनीचेही मिळणार आधारकार्ड; नवीन शासन निर्णय जारी

2) आयटीआर फाईल करणाऱ्यास दंड

३१ जुलैनंतर आयटीआर फाईल करण्याऱ्या करदात्याला दंड भरावा लागणार आहे. जर एखाद्या करदात्याचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला ५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. जर, एखाद्या करदात्याचं वार्षिक ५ लाखांपेक्षा कमी असेल तर त्या करदात्याला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

3) चेक व्यवहारात बदल

बँक ऑफ बडोदाने १ ऑगस्टपासून चेकमार्फत होणाऱ्या व्यवहारांसाठी (Transactions through Cheques) नियम (rules)बदलले आहेत. ५ लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे चेकच्या व्यवहारांसाठी पॉझिटीव्ह पे सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. चेक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा 
Cotton Varieties: देशी कापसाचे नवीन वाण 160 दिवसात तयार; जाणून घ्या 'या' वाणाविषयी

4) गॅस सिलिंडर महाग होऊ शकतो

प्रत्येक महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे या महिन्यातही घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ होऊ शकते.

5) १८ दिवस बँका राहतील बंद

ऑगस्ट महिन्यात १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. मोहरम, रक्षा बंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी या सर्वांच्या मिळून एकूण १८ दिवस बँक बंद राहणार आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांची यादी जरूर तपासा.

महत्वाच्या बातम्या 
Monkeypox: 'या' देशात मंकीपॉक्सचा दुसरा बळी; जगभरात आढळले 20 हजारांहून रुग्ण
Horoscope: 'या' 4 राशीचे लोक असतात खूप सरळ स्वभावाचे; जाणून घ्या 'या' राशीविषयी
Crop Insurance Scheme: पीकविम्याचे धोरण बदलले; शेतकऱ्यांना होणार 'हा' मोठा फायदा, जाणून घ्या..

English Summary: pockets common people need scissors August 1
Published on: 31 July 2022, 11:32 IST