पंतप्रधान किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपल्याला माहित आहेच की या योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येतात.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चा दावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करीत असताना योजनेबद्दल सांगितले की, एम किसान सन्मान योजना सुरू करावी ही मागणी सरकारकडे कोणीही केली नव्हती मात्र देशात 86 टक्के शेतकरी अल्पभूधारक गटात आहेत आणि अशा शेतकऱ्यांना पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात व त्यांचा विकास व्हावा हे केंद्र सरकारचे धोरण आहे. यावेळी मोदी यांनी सांगितले की या योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पायाभूत बाबी घेता येणे सोपे झाले आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती पाहूनच हा निर्णय घेण्यात आला होता.
आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या परंतु पी एम किसान सन्मान योजना ही एक अशी योजना आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जातात. या मध्ये कोणत्याही प्रकारचे मध्यस्थी व कपात न करता थेट आर्थिक लाभ लाभार्थ्यांना दिला जातो असं मोदींनी स्पष्ट केले. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा खंड न पडू देता योजनेच्या माध्यमातून 1 लाख 80 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयाचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत असून त्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.
योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सुरू करण्यात आलेली असून वर्षभराच्या या रकमेतून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खाते व इतर शेती आवश्यक बाबींसाठी हा पैसा वापरता येतो. शासनाच्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर होत असल्याचे समाधान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Published on: 03 January 2022, 06:14 IST