पंतप्रधान किसान सन्मान निधी चा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्त्व पटवून देताना या शेतकरी उत्पादक कंपन्यांची पाच महत्वाचे फायदे अधोरेखीत केले
देशामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे विस्तारत असून या माध्यमातून एकजूट व त्याचे फायदे काय असतात हे समोर येत आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जवळजवळ एक लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये वर्ग करण्यात आले.
नरेंद्र मोदींनी सांगितले शेतकरी उत्पादक कंपन्यांचे हे पाच फायदे…
- शेतकरी कंपन्यांमुळे मोठ्या स्तरावर व्यापार करणे शक्य झाले असून व्यापार जेवढा मोठा त्या प्रमाणात अधिक नफा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे.
- एका शेतकऱ्याने शेती करणे आणि शेतकऱ्यांच्या समूह एकत्र येऊन योग्य नियोजनातून शेती करणे यामध्ये मोठा फरक आहे. शेती उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन टिकते आणि शेती मालाचे मूल्य ठरवता येते.
- शेतकरी उत्पादक कंपनी यांमध्ये अनेक शेतकरी असल्याने वेगवेगळ्या कल्पना पुढे येतात आणि त्या माध्यमातून सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेणे सोपे होते.
- एकटा शेतकरी कुठल्याही बाबतीत निर्णय घेताना देऊ शकत नाही परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या समोर शेतीमध्ये हे धाडस करणे शक्य आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होते तसेच नवीन धोरणे स्वीकारताना ज्या अडचणी येतात त्यावर मात देखील करता येते.
- शेतकरी उत्पादक कंपनी याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या कंपन्यांनी पिकवलेल्या शेतीमालाचे दर ठरवतात व ते दर बाजारपेठेत असतात. कारण एका शेतकऱ्यास बाजारपेठेचे गणित मांडणे व त्याचा अभ्यास करणे कठीण जाते पण उत्पादक कंपन्यांमध्ये शक्य आहे.
Published on: 02 January 2022, 06:45 IST