पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एक जुलैला वसमत तालुक्यातील सातेफळ येथील सूर्या फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे शेतकरी प्रल्हाद बोरकर यांच्याशी संवाद साधला. हा संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई नाम योजनेमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या फायदा बद्दल माहिती घेऊन बोरकर यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई नाम योजनेचा शेतकऱ्यांना होत असलेला फायदा तसेच या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद जाणून घेण्यासाठी भारतातील झारखंड, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सातेफळ येथील सूर्या फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक व शेतकरी प्रल्हाद बोरकर यांच्याशी चर्चा करण्याचे त्यांनी निश्चित केले होते.
त्यानुसार नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी प्रल्हाद बोरकर यांच्याशी संवाद साधला. या संवाद यावेळी प्रल्हाद बोरकर यांनी ई नाम योजनेचा शेतकऱ्यांना होत असलेला फायदा याबद्दल त्यांना माहिती दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळाल्याचेही बोरकर यांनी सांगितले.
प्रल्हाद बोरकर यांच्या सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने गेल्या वर्षी तब्बल 2.75 कोटी रुपयांची शेतमाल विक्रीतून उलाढाल केली आहे. शेतकऱ्यांनी या कंपनीकडे शेतीमाल विक्रीसाठी दिल्यानंतर त्यावर क्रमांक टाकून शेतीमाल विक्रीसाठी मोंढ्यात ठेवला जातो.
त्यानंतर संबंधित शेतमाल विकत घेण्यासाठी खरेदीदारांनी दर ठरवल्यानंतर त्याची माहिती शेतकऱ्यांच्या मोबाईल वर पाठवले जाते. त्यानंतर अर्ध्या तासाचा वेळ शेतकऱ्यांना दिला जात असून त्यांच्या संमतीने शेतीमाल विक्री होत असल्याचे बोरगड यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रल्हाद बोरकर यांच्या सर्व प्रक्रिया व शेतकऱ्यांना झालेला फायदा व इ नाम योजनेच्या माध्यमातून सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी केलेली उडालाय कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच या योजनेबद्दल इतर शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा सल्लाही त्यांनी प्रल्हाद बोरकर यांना दिला आहे.
माहिती स्त्रोत – दिव्य मराठी
Published on: 02 July 2021, 11:36 IST