News

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केले. सामरिक क्षमता ते कृषी सुधारणा अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केले. छोट्या शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या मुद्द्यांवर भर देताना पंतप्रधानांनी कृषी सुधारणा हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे म्हटले आहे.

Updated on 17 August, 2021 6:00 AM IST

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केले. सामरिक क्षमता ते कृषी सुधारणा अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केले. छोट्या शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या मुद्द्यांवर भर देताना पंतप्रधानांनी कृषी सुधारणा हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे म्हटले आहे.

एमएसपी दीडपट वाढवणे, किसान क्रेडिट कार्ड (kisan credit card), शेतकरी उत्पादक संघटना यांसारख्या प्रयत्नांमुळे लघु व सीमांत शेतकऱ्यांना बळ मिळेल. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून १० कोटी कुटुंबांना मदत दिली जात असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

  • वाढती लोकसंख्या आणि कुटूंब विभाजनामुळे जमीनीचे प्रति व्यक्ती प्रमाण कमी होत असल्याची चिंता पंतप्रधानांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. लहान शेतकरी देशाची शान व्हावा हे आमचे स्वप्न असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

  • देशातील 80% हून अधिक शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. शंभरापैकी ऐंशी शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे.

  •  पीक विमा योजना सुधारणा, किमान आधारभूत किंमत दीडपट करणे, शेतकरी क्रेडीट कार्डच्या माध्यमातून बँकेकडून स्वस्त दरात कर्ज उपलब्धता, कृषी उत्पादक संघटना हे सर्व उपक्रम लहान शेतकऱ्यांना अधिक सशक्त करतील. येणाऱ्या काळात, ब्लॉक पातळीवर साठवण गोदामांची सुविधा निर्माण करण्याचा देखील उपक्रम राबविण्यात येणार आहे.

  •  प्रत्येक लहान शेतकऱ्याला कराव्या लागणाऱ्या छोट्या छोट्या खर्चाचा विचार करून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.

  • आज देशातील 70 हून अधिक रेल्वे मार्गांवर शेतकरी विशेष गाड्या चालविली जात आहेत. या सेवेद्वारे लहान शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन किफायतशीर वाहतूक खर्चासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी ही आधुनिक सोय उपलब्ध झाली आहे.

  • स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आज प्रत्येक गावातील घराच्या मालकीच्या जमिनीचे ड्रोनच्या सहाय्याने संदर्भ-निश्चिती करण्यात येत आहे. गावातील जमिनींची माहिती आणि या संपत्तीच्या हक्कांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येत आहेत.

English Summary: PM Narendra modi addresses the nation on the occasion of Independence Day
Published on: 17 August 2021, 06:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)