Pm modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.१२) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज महाराष्ट्रात नवीन कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. मुंबईत नव्याने गतिशीलतेत वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी आज करणार आहेत. तर नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
सुमारे १७ हजार ८४० कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल, तसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची पायाभरणी करणार आहेत.
रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, प्रधानमंत्री सिप्झ सेझ येथे ‘भारतरत्नम‘ आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) ०१ चे ही ते उद्घाटन करणार आहेत. रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आज होणार आहे. महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी प्रधानमंत्री महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचाही आज प्रारंभ होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नाशिकमध्ये रोड शो होणार आहे. या रोड शो ला एक ते दीड लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यानंतर मोदी रामकुंडावर जाणून जलपूजन करणार आहेत. त्यानंतर काळाराम मंदिरात जाणून दर्शन घेणार आहेत.
Published on: 12 January 2024, 11:16 IST