1. बातम्या

पंतप्रधान मोदींनी केली स्ट्रॉबेरी गर्लची स्तृती; बुंदेलखंडमध्ये फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

स्ट्रॉबेरी म्हटले की, आपल्याला वाई, खंडाळा आठवते. पण उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये कसे शक्य आहे. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात बुंदेलखंडच्या स्ट्रॉबेरीचा उल्लेख केला तेव्हा आपल्याला तेथील एका स्ट्रॉबेरी गर्लची ओळख झाली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
strawberry girl  (Photo - Ani)

strawberry girl (Photo - Ani)

स्ट्रॉबेरी म्हटले की, आपल्याला वाई, खंडाळा आठवते. पण उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये कसे शक्य आहे. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात  बुंदेलखंडच्या स्ट्रॉबेरीचा  उल्लेख केला तेव्हा आपल्याला तेथील एका स्ट्रॉबेरी गर्लची ओळख झाली. या स्ट्रॉबेरी गर्लचे नाव आहे गुरलीन चावला, ही २३ वर्षीय गुरलीन कायद्याची पदवीधर असून तिने आपल्या राज्यातील पुण्यात शिक्षण घेतले आहे.

कोरोनामुळे जगात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यापासून आपला देशही सुटला नाही. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपल्यातील हुन्नरपणा जगासमोर आणला अनेकांनी नवीन व्यवसायाची सुरुवात केली. अशीच एक सुरुवात बुंदेलखंडातील गुरलीन चावलाने केली आहे, तेपण शेती करुन. गुरलीनने बुंदेलखंडात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेऊन देशातील तरुणींसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. गुरलीन चावलाची स्ट्रॉबेरी शेती इतकी प्रचलित झाली की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात तिचे कौतुक केले.

गुरलीन ही उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये राहते, स्ट्रॉबेरीच्या शेतीमुळे ती रातोरात स्टार झाली आहे. दरम्यान गुरलीनने पुण्यातून कायद्याची पदवी घेतली आहे. माध्यमांशी बोलातना गुरलीन सांगते की, शेती करेन असे कधी वाटले नव्हते. लॉकडाऊनमध्ये घरी आली होती. रिकामा वेळ असायचा. तेव्हा त्याचा काहीतरी फायदा करायचा विचार आला  मला गार्डनिंग खूप आवडते. यामुळे मी घरीच स्ट्रॉबेरीची काही रोपे लावली आणि काही दिवसातच स्ट्रॉबेरी धरू लागली.

गुरलीनने स्ट्रॉबेरीची शेती ऑनलाईन शिकून घेतली. गार्डनमध्ये लावलेली रोपटी पाहून वडिलांनीही साथ दिली. याची मोठी लागवड केली पाहिजे असे गुरलीनला म्हणाले. दरम्यान गुरलीन यांच्याकडे ४ ते ५ एकर जागा होती, ऑक्टोबरमध्ये तीने २० हजार स्ट्रॉबेरीची रोपे खरेदी केली. ती दीड एकरात लावली त्याला डिसेंबरमध्ये बहर आला. या  झाडांना फळ धरू लागली तेव्हा लोकल बाजारात संपर्क साधला. त्यांना फळे आवडली. गुरलीनने झांशी ऑर्गेनिक्स नावाची वेबसाईटही बनवली आहे. एकूण सात एकर जमिनीवर ती शेती करत आहे. दिवसाला तिने ७० किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेते. २५०  हून अधिक ऑर्डर येतात. 

यापैकी काही वेबसाईटवरुनही येतातय दिवसाला ३० हजार रुपयांची विक्री करत असल्याचे ती म्हणाली. गुरलीनला शेती व्यवसाय करताना पाच महिने  झाले  आहेत. परंतु  तिची दाखल  मोदींनीही घेतली आहे.

English Summary: PM Modi celebrates strawberry girl, cultivates strawberries in Bundel-khand Published on: 03 February 2021, 01:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters