News

आता शेतकऱ्यांना सोलर प्लांट बसवण्यासाठी मोफत कर्ज मिळणार आहे. आता काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना सिंचनाचे चांगले साधन देण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे.

Updated on 04 February, 2022 4:48 PM IST

आता शेतकऱ्यांना सोलर प्लांट बसवण्यासाठी मोफत कर्ज मिळणार आहे. आता काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना सिंचनाचे चांगले साधन देण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम कुसुम योजनेंतर्गत, सरकार राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौरऊर्जेद्वारे चालणाऱ्या सौर पंपांची सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रधान मंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या पंपांना सौर उर्जा पंपामध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी किमान ३० टक्के कर्ज शेतकऱ्यांना बँकेकडून दिले जाते आणि १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. अशा परिस्थितीत राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्यातील शेतकरी आता तारणमुक्त कर्जाद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

राजस्थानचे शेतकरी पीएम कुसुम योजना ए अंतर्गत ओसाड आणि पडीक जमिनीवर अर्धा किलोवॅट ते 2 मेगावॅटपर्यंतचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सुरक्षेशिवाय बँकांकडून कर्ज करू शकतात. म्हणजेच आता प्रकल्प उभारू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जासाठी काहीही गहाण ठेवावे लागणार नाही.

अर्जाची तारीख

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. कारण यामध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी निश्चित करण्यात आलीआहे. राजस्थान विद्युत वितरण महामंडळाच्या 33/11 केव्ही उपकेंद्राच्या 5 किमीच्या परिघात, शेतकऱ्यांच्या नापीक आणि निरुपयोगी जमिनीवर, अर्धा किलोवॅट ते मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केले जाऊ शकतात.

सौरऊर्जेवर उत्पादित होणारी वीज 3 रुपये 14 पैसे दराने 25 वर्षांसाठी खरेदी केली जाईल. 25 वर्षांच्या सौरऊर्जा उत्पादक शेतकऱ्यासाठी वीज खरेदी करण्याची व्यवस्थाही सुनिश्चित करण्यात आली आहे.

English Summary: PM Kusum Yojana: Now farmers will get free loans for setting up solar plants; Do this application
Published on: 04 February 2022, 04:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)