शेतीला पाण्याची नितांत आवश्यकता असते. जर पिकांना पाण्याचा योग्य वेळी पुरवठा झाला तरच हातात अपेक्षित उत्पादन मिळणे शक्य असते. नाहीतर पाण्याचा वेळेवर पुरवठा झाला नाही तर हातचे पिके जाण्याची दाट शक्यता निर्माण होते.
आता आपल्याला माहित आहेच की, शेतीला पाणीपुरवठा करणे म्हणजे कृषी पंपाला वेळेत वीज पुरवठा होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु शेतातील थ्री फेजचा विजेचा विचार केला तर स्वतःच्या थोबाडीत मारण्यासारखे आहे. शेतांना फक्त आठ तास वीज पुरवठा होतो. तोही आओ जाओ घर तुम्हारा या उक्तीप्रमाणे कधी येते तर कधी जाते हेच कळत नाही. त्यातही लोडशेडिंग अशाप्रकारच्या बर्याच समस्या निर्माण होतात त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. त्यामुळे एकदाच काय या समस्येचा सोक्षमोक्ष करण्यासाठी पीएम कुसुम योजना चा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी या समस्येवर कायमचा तोडगा काढणे फार गरजेचे आहे. या लेखा मध्ये या योजनेची माहिती घेऊ.
नक्की वाचा:कृषी विभागाचा हा आदेश ठरेल शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर, काय होईल शेतकऱ्यांना फायदा?
पीएम कुसुम योजना
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना सोलर पंपावर अनुदान देते. हे सोलर पंप वापरून शेतकरी आपल्या शेतातील पिकांना अगदी वेळेस पाण्याचा पुरवठा करू शकतात व चांगली उत्पादने मिळवू शकतात.
अगदी कुठल्याही झंझटीविना. एवढेच नाही तर तुमच्या असलेल्या वसाड किंवा पडीक जमिनीवर सोलर प्लांट बसून तुम्ही प्रति महिन्याला एक निश्चित स्वरुपाचे उत्पन्नदेखील हातात मिळवू शकतात. या क्षेत्रातील तज्ञ मानतात की, एक मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प तुम्हाला बसवायचा असेल तर चार ते पाच एकर जमीन लागते व या माध्यमातून प्रतिवर्षी दीड दशलक्ष युनिट वीज निर्मिती होणे शक्य आहे. तसेच वीज विभागाकडून देखील 3 रुपये 75 पैसे दराने या विजेची खरेदी केली जाते. याचा हिशोब केला तर एका सोलर पंप प्लांट मधून शेतकरी वर्षाला 40 ते 45 लाख रुपये सहज कमवू शकतात. एवढेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून शासनातर्फे 60 टक्के अनुदान देखील दिले जाते.
नक्की वाचा:डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची गंगा तरुणाईने शेतकऱ्यांपर्यत पोहचावी- डॉ. राजेंद्र गाड तसेच यासाठी तुम्ही कर्ज घेतले तर या कर्जाच्या किंमतीच्या 30 टक्के रक्कम देखील सरकार देते. म्हणजे केवळ दहा टक्केच खर्च त्यासाठी करावा लागणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी साडेसतरा लाख रुपयांचा निधी देखील दिला जातो. तसेच शेतकरी दहा हजार मेगावॅट असा विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प पडीक जमिनीवर उभारतील जो पडीक जमिनीवर ग्रीडशी जोडला जाईल. या योजनेसाठी शेतकरी गट, शेतकरी पंचायती तसेच सहकारी संस्था सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात.अगदी कुठल्याही झंझटीविना. एवढेच नाही तर तुमच्या असलेल्या वसाड किंवा पडीक जमिनीवर सोलर प्लांट बसून तुम्ही प्रति महिन्याला एक निश्चित स्वरुपाचे उत्पन्नदेखील हातात मिळवू शकतात. या क्षेत्रातील तज्ञ मानतात की, एक मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प तुम्हाला बसवायचा असेल तर चार ते पाच एकर जमीन लागते व या माध्यमातून प्रतिवर्षी दीड दशलक्ष युनिट वीज निर्मिती होणे शक्य आहे. तसेच वीज विभागाकडून देखील 3 रुपये 75 पैसे दराने या विजेची खरेदी केली जाते. याचा हिशोब केला तर एका सोलर पंप प्लांट मधून शेतकरी वर्षाला 40 ते 45 लाख रुपये सहज कमवू शकतात. एवढेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून शासनातर्फे 60 टक्के अनुदान देखील दिले जाते.
तसेच यासाठी तुम्ही कर्ज घेतले तर या कर्जाच्या किंमतीच्या 30 टक्के रक्कम देखील सरकार देते. म्हणजे केवळ दहा टक्केच खर्च त्यासाठी करावा लागणार आहे.
तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी साडेसतरा लाख रुपयांचा निधी देखील दिला जातो. तसेच शेतकरी दहा हजार मेगावॅट असा विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प पडीक जमिनीवर उभारतील जो पडीक जमिनीवर ग्रीडशी जोडला जाईल. या योजनेसाठी शेतकरी गट, शेतकरी पंचायती तसेच सहकारी संस्था सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात.
Published on: 13 April 2022, 10:26 IST