शेतकरी मित्रांनो पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या पात्र शेतकऱ्यांचे होळीनंतर तोंड गोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की, केंद्र सरकार होळीनंतर या योजनेचा 11वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे वृत्त समोर होत आहे.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना प्रत्येकी वीस हजार अर्थात 10 हप्ते देण्यात आले आहेत. देशातील एकूण अकरा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना होळीनंतर या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यामुळे या योजनेच्या पात्र शेतकर्यांना होळीच्या दिवसात नाही मात्र, होळीनंतर आनंदाची बातमी मीळणार आहे एवढे नक्की. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या योजने अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये एकूण तीन हफ्त्याच्या स्वरूपात दिले जातात.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने एकूण तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात, म्हणजेच एक आर्थिक वर्षात तीन हफ्ते दिले जातात, पहिल्या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान दिले जातात. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात.
म्हणुन या योजनेचा 11वा हफ्ता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे समजत आहे. एकंदरीत शेतकरी बांधवांना होळीच्या शुभमुहूर्तावर या योजनेचा अकरावा हप्ता अर्थात दोन हजार रुपये मिळणार आहेत.
Published on: 06 March 2022, 11:59 IST