मोदी सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी PM kisan Yojna पीएम किसान योजना सुरु केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळतात. असे असताना या योजनेत अनेक बदल होत गेले आहेत. आतापर्यंत या योजनेचे १० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता सरकारने ११ व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी पळापळ सुरू आहे. तसेच हे काम करताना अनेक अडचणी येत आहेत.
तसेच याकरिता 31 मार्च ही अखेरची मुदत होती. मात्र, स्थानिक पातळीवरच्या अडचणी आणि शेतकऱ्यांना पुरेसा वेळा मिळावा या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे. यासाठी आता 31 मे पर्यंतची मुदत असणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जानेवारीमध्ये 10 हप्ता जमा झाल्यानंतरच e-KYC हे बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. आता त्यांना मोठा कालावधी मिळणार आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी e-KYC केले नाही अशा शेतकऱ्यांची नावे ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यानुसार आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल नंबर याची पूर्तता करुन शेतकऱ्यांना e-KYC करता येणार आहे. तसेच सध्या ज्यांनी नियमात बसत नसताना देखील याचा लाभ घेतला आता त्यांच्याकडून देखील पैसे वसूल केले जाणार आहेत.
या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. वर्षाकाठी 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. योजनेचे हे 6 वे वर्ष आहे. सध्या शासकीय कर्मचारी, आयकर अदा करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नसताना देखील अनेकांनी याचा लाभ घेतला आहे. आता अशा नागरिकांकडून वसुली केली जात आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या वसुलीची जबाबदारी ही महसूल आणि कृषी विभागावर आहे. याबाबत लवकरच पैसे वसूल केले जाणार आहेत. यामुळे आता अनेकांना पैसे माघारी करावे लागणार आहेत. याबाबत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच त्यांना अगोदरच पैसे भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. ही नावे देखील गुप्त ठेवण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
जमिनीची मशागत नांगरट कशी करायची, वाचा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा महत्वाचा सल्ला.
चाळीसगावमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
बाजार समित्या टिकवण्यासाठी शशिकांत शिंदे मैदानात, समस्यांचा वाचला पाढा, सहकारमंत्री म्हणाले..
Published on: 26 March 2022, 12:55 IST