News

नवी मुंबई : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agruculture Country) आहे. यामुळे आपले केंद्र सरकार (Central Government) शेतकरी बांधवांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना (Farmers Scheme) आणत असते.

Updated on 21 May, 2022 11:36 PM IST

नवी मुंबई : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agruculture Country) आहे. यामुळे आपले केंद्र सरकार (Central Government) शेतकरी बांधवांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना (Farmers Scheme) आणत असते.

केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत विविध शेतकरी हिताच्या योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जातं आहे.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा एक हफ्ता अशा तीन हप्त्यांच्या स्वरूपात दिले जातात.

Small Business Idea 2022: कमी गुंतवणूकीत सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा लाखों; वाचा याविषयी

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 हप्ते पाठवले असून 11 व्या हप्त्याचे पैसे मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येणे अपेक्षित आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे सरकारने पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने केवायसीसाठी अंतिम मुदत वाढवली आहे. पीएम किसान पोर्टलवरील अद्ययावत माहितीनुसार, शेतकरी 31 मे 2022 पर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. मित्रांनो केवायसी करण्याची अंतिम तारीख यापूर्वी 31 मार्च 2022 होती. ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी.

Sarkari Yojana Information: 'या' सरकारी योजनेचा लाभ घ्या; 1 रुपयात मिळणार 2 लाखांचा विमा; वाचा सविस्तर

ई-केवायसी का केली बंधनकारक

या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत अलीकडे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. असे काही प्रकरणे समोर आली होती ज्यात अपात्र शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते. यामुळे मोदी सरकारने अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांनी जर केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेचा आगामी हफ्ता दिला जाणार नाही.

 

या शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या योजनेचा लाभ जे लोक घटनात्मक पदांवर आहेत, त्यांना घेता येणार नाही. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा PSU किंवा कोणत्याही सरकारी संस्थेत काम करणारी व्यक्ती शेती करत असेल तर त्याला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन शेतकरी लाभार्थी यादीत आपले नाव तपासू शकतात.

Pm Kisan Yojana: प्रतीक्षा संपली; 'या' दिवशी आता फिक्स जमा होणार 2 हजार

 

यादीत या पद्धतीने नाव तपासा

सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

त्यानंतर होमपेजवर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी निवडा.

दिलेल्या ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

त्यानंतर 'Get Report' वर क्लिक करा.

यानंतर संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळतील 29 हजार 700 रुपये; वाचा याविषयी

English Summary: Pm Kisan Yojana: 'Ya' farmers will not get 2 thousand; Check your name in the 'Ya' method in the list
Published on: 21 May 2022, 11:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)