News

पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Yojana) ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Sarkari Yojana) आहे. या योजनेच्या 11व्या हप्त्याची देशातील करोडो शेतकरी (Farmers) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या कोट्यावधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

Updated on 18 May, 2022 4:30 PM IST

पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Yojana) ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Sarkari Yojana) आहे. या योजनेच्या 11व्या हप्त्याची देशातील करोडो शेतकरी (Farmers) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या कोट्यावधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

जे पात्र शेतकरी बांधव 2000 रुपयांच्या 11व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना तो हप्ता लवकरच दिला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस 11 वा हप्ता येणे अपेक्षित आहे. आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की, देशभरात आतापर्यंत 12.5 कोटी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले आहेत.

शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याचे पैसे 31 मे आधीच मिळणार 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आतापर्यंत सुमारे 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे काम पूर्ण केले आहे. सर्वांना माहिती आहे की, या योजनेचा 11वा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. अशा स्थितीत आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. यासोबतच या योजनेतील 11वा हप्ता 31 मे पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा दावाही केला जात आहे.

Business Idea: बारामाही डिमांड मध्ये असलेला हा व्यवसाय बनवु शकतो कमी वेळेत श्रीमंत; वाचा सविस्तर

यावेळी हफ्ता येण्यास उशीर का?

वास्तविक, यावेळी शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण या वेळी या योजनेचा हप्ता येण्यास उशीर झाला आहे. 2021 मध्ये एप्रिल-जुलैचा हप्ता 15 मे रोजी शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र यावेळी 31 मे पर्यंत हफ्ता येण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात मधुमक्याची शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान; जाणुन घ्या मधूमका शेतीविषयी बहुमूल्य माहिती

ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढवली

11 वा हप्ता येण्यापूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने तारीख वाढवली आहे. यापूर्वी, जिथे ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च ठेवण्यात आली होती, ती आता 31 मे करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर ती लवकरात लवकर करा कारण ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत.

सावधान! 'या' लोकांनी चुकूनही टोमॅटो खाऊ नये; नाहीतर आरोग्यावर होतील 'हे' घातक परिणाम

English Summary: Pm Kisan Yojana: The wait is over; On this day, 2 thousand fixes will be collected
Published on: 18 May 2022, 04:30 IST