2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्याआहेत. या योजनांतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत असते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देखील एक अशीचं योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्य केले जात आहे.
या सरकारी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. मित्रांनो या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.
रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते
सरकार ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग करत असते. याअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतात.
मोदी सरकारने ही योजना 2019 मध्ये सुरू केली होती. सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 10 हप्ते पाठवले आहेत. शेतकरी आता 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
10व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. आता 11 वा हप्ता 15 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जे शेतकरी कोणत्याही घटनात्मक पदावर असतील, किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा PSU किंवा कोणत्याही सरकारी संस्थेमध्ये काम करत असतील त्यांना मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून वगळले आहे.
अर्थात हे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. कुटुंबातील फक्त एका सदस्याला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळू शकतो. दुसऱ्या सदस्याने आर्थिक फायदा घेतल्यास त्याच्यावर कारवाई होऊन पैसेही वसुल केले जाणार आहेत.
11व्या हप्त्यासाठी e-KYC आवश्यक
पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया अनिवार्य केली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केलेली नसेल तर त्याला 11व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
Published on: 12 May 2022, 10:51 IST