News

Pm Kisan Yojana| देशातील शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने सध्या देशात अनेक योजना राबविल्या आहेत. शेतकरी हिताच्या योजना तसेच सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रोजगार, शिक्षण, विमा संरक्षण अशा अनेक प्रकारच्या योजना सध्या देशात सुरू आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनाही (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आहे.

Updated on 22 July, 2022 9:00 AM IST

Pm Kisan Yojana| देशातील शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने सध्या देशात अनेक योजना राबविल्या आहेत. शेतकरी हिताच्या योजना तसेच सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रोजगार, शिक्षण, विमा संरक्षण अशा अनेक प्रकारच्या योजना सध्या देशात सुरू आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनाही (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. हा लाभ 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. परंतु काही शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतानाही चुकीच्या पद्धतीने ह्या योजेनेचा लाभ घेत आहेत. ज्यावर आता सरकारने कारवाई देखील सुरू केली आहे.

अशा परिस्थितीत तुमचे नाव या यादीत समाविष्ट आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत तुम्ही चुकीच्या मार्गाने फायदा घेतला तर त्याची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण हे करणार्‍या अपात्र शेतकर्‍यांना हप्त्याचे पैसे परत करावे लागतील, त्यामुळे तुमचे नाव देखील या यादीत आहे की नाही हे तुम्ही कसे तपासाल ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पीएम किसान सन्मान योजनेतील हप्त्याचे पैसे तुम्हाला परत करायचे आहेत की नाही हे तुम्हाला ऑनलाईनद्वारे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसान पोर्टलच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटची https://pmkisan.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. ज्यावर तुम्ही भेट देऊ शकता आणि तुम्हाला हप्त्याचे पैसे परत करायचे आहेत की नाही हे जाणून घेऊ शकता.

जेव्हा तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्हाला पूर्वीच्या कोपऱ्यावरच 'Refund Online' पर्याय मिळेल, त्यानंतर त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर मागितलेली माहिती भरा.

त्यानंतर, विनंती केलेली माहिती भरल्यानंतर, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकावा लागेल तसेच कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि 'Get Data' वर क्लिक करावे लागेल.

यानंतर, जर तुमच्यासमोर 'You Are Not Eligible for Any Refund Amount' असा मेसेज दिसला, तर याचा अर्थ तुम्हाला हप्त्याचे पैसे परत करण्याची गरज नाही. परंतु जर स्क्रीनवर 'Refund Online' चा पर्याय दिसत असेल, तर याचा अर्थ तुम्हाला हप्त्याचे पैसे परत करावे लागतील, जर तुम्ही वेळेत हफ्त्याचे पैसे सरकारकडे जमा केला नाही, तर तुम्हाला कधीही याची नोटीस बजावली जाऊ शकते.

English Summary: Pm Kisan Scheme farmer have to return money
Published on: 22 July 2022, 09:00 IST