देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या तसेच शेतकऱ्याच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. अशा परिस्थितीत केंद्राची पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) देशातील शेतकऱ्यांसाठी (Farmers Scheme) अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या योजनेंतर्गत, सरकार (Government) शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमधून खात्यात पाठवते. आता हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार (Central Government) 31 मे रोजी 11 वा हप्ता जारी करू शकते.
31 मे ला मिळणार 2 हजार
मिडिया रिपोर्टनुसार, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी शिमला येथून किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करू शकतात. यावेळी पंतप्रधान देशातील विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांशीही चर्चा करतील. देशात सत्तेत असताना भाजपच्या मोदी सरकारने यशस्वीपणे आठ वर्षे पूर्ण केली आहेत.
यानिमित्त हिमाचल प्रदेशमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तेथून पंतप्रधान शेतकर्यांसाठी 11 वा हप्ता जारी करतील अशी दाट शक्यता असल्याचे सांगितले जातं आहे.
पीएम किसान यादीत तुमचे नाव तपासा
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी, सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. येथे फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल. यानंतर लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. नवीन पृष्ठावर, तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तपशील प्रविष्ट करा. त्यानंतर Get Report वर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळेल.
पंतप्रधान किसान योजना कधी सुरू झाली?
पीएम मोदींनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपूर, यूपी येथे एका कार्यक्रमात या योजनेचा औपचारिक शुभारंभ केला. देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्व शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांची कृषी आणि संबंधित कामे तसेच घरातील खर्च भागवता येईल.
पीएम किसान योजनेसाठी पात्रता काय
खरं तर, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करते. अशाप्रकारे शासनाकडून वर्षभरात एकूण 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. वास्तविक, 2 हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचे पैसे वाढणार आहेत का?
मध्यँतरी या योजनेचे पैसे वाढतील अशा चर्चेला मोठं उधाण आले होते मात्र, सरकारने या वर पूर्णविराम लावला होता. अद्याप तरी या योजनेची रक्कम वाढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Published on: 28 May 2022, 02:33 IST