News

देशात अनेक दिवसापासून एकाच चर्चेला उधाण आलं आहे, ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता कधी भेटणार? पण आता या प्रश्नाचे उत्तर समोर येताना दिसत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना यासाठी जवळपास अकरा कोटी शेतकरी पात्र आहेत. या अकरा कोटी शेतकर्‍यांचे प्रतीक्षा अखेर संपणार असे चित्र आता दिसत आहे. अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनात दहाव्या हफ्त्याविषयी अनेक शंका-कुशंका घर करू लागले होते. प्रसारमाध्यमांमध्ये दहाव्या हफ्त्याविषयी अनेक बातम्या समोर येत होत्या, त्यामुळे शेतकरी राजा अजूनच जास्त परेशान होत होता. पण आता चिंता करण्याचे काही कारण नाही. अखेर पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हफ्त्यासाठी सरकारला मुहूर्त सापडला आहे.

Updated on 31 December, 2021 8:18 PM IST

देशात अनेक दिवसापासून एकाच चर्चेला उधाण आलं आहे, ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता कधी भेटणार? पण आता या प्रश्नाचे उत्तर समोर येताना दिसत आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजना यासाठी जवळपास अकरा कोटी शेतकरी पात्र आहेत. या अकरा कोटी शेतकर्‍यांचे प्रतीक्षा अखेर संपणार असे चित्र आता दिसत आहे. अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनात दहाव्या हफ्त्याविषयी अनेक शंका-कुशंका घर करू लागले होते. प्रसारमाध्यमांमध्ये दहाव्या हफ्त्याविषयी अनेक बातम्या समोर येत होत्या, त्यामुळे शेतकरी राजा अजूनच जास्त परेशान होत होता. पण आता चिंता करण्याचे काही कारण नाही. अखेर पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हफ्त्यासाठी सरकारला मुहूर्त सापडला आहे.

आता पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हफ्ता नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी एक तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असे संकेत दिले जात आहेत. 

भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी एक तारखेला शेतकऱ्यांशी नववर्षाच्या निमित्ताने संवाद साधणार आहेत त्यावेळीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जमा होणार आणि यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी जवळपास झाल्यातच जमा आहे.

राज्यातील किती शेतकरी आहेत पात्र

पीएम किसान सम्मान निधि योजना माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक आहे, ही योजना केंद्राद्वारे राबवली जात आहे. या योजनेसाठी देशभरातील एकूण अकरा कोटी शेतकरी पात्र आहेत. राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी 2000 कोटींची निधी मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधीचा पैसा काढण्यासाठी लगेच बँकेत गर्दी करु नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

ई-केवायसी नसेल तरी मिळेल दहावा हफ्ता

पीएम किसान सन्मान निधी योजना साठी पात्र शेतकऱ्यांच्या मनात अनेक दिवसांपासून एकाच विचाराने काहूर माजवले आहे, ते म्हणजे ई-केवायसी केली नसेल तर पीएम किसान निधीचा दहावा हफ्ता मिळेल की नाही? याच प्रश्नाचे उत्तर आम्ही आज आपणासाठी घेवून आलो आहोत. शेतकरी मित्रांनो जरी आपण अद्याप पर्यंत ई-केवायसी केलेली नसेल तरी आपणास पीएम किसान सन्मान निधी चा दावा हप्ता हा मिळणार आहे. परंतु, मार्च 2022 पासून पुढे येणारे पीएम किसान सन्मान निधीच्या हा त्यांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्‍यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी मार्च 2022 च्या आत ई-केवायसी करणे गरजेचे आहे नाहीतर भविष्यात येणाऱ्या पीएम किसान सम्मान निधिचा हफ्ता मिळणार नाही.

English Summary: pm kisan sanman nidhi amount will be delivered soon without e-kyc 10th installment also disbursed
Published on: 30 December 2021, 12:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)