News

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे. आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात म्हणजेच 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केले जातात.

Updated on 16 March, 2022 3:47 PM IST

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे. आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात म्हणजेच 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केले जातात.

या योजनेमध्ये शासनाने बऱ्याच प्रकारचे बदल केले आहेत. काही कागदपत्रांची आवश्यकता मध्ये बदल केले तर काही नियमांमध्ये बदल केले आहेत. आता लवकरच या योजनेच्या माध्यमातून मिळणारा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना कळत नाही की त्यांच्या खात्यावर पैसे किती आले आणि कधी हे ट्रान्सफर करण्यात आले? या समस्येवर उपाय म्हणून सरकारने एकतुमच्या ॲप तयार केले असून या ॲपचं नाव आहे जिओआय मोबाईल ॲप होय. हे आता तुमच्या मोबाईल वरील प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. हे ॲप आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

तुम्ही या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने तुमचा आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर च्या मदतीने किसान सन्मान निधी योजना विषयीची माहिती मिळू शकणार आहात  व तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यात किती रक्कम जमा झाली व कधी झाली हे देखील तुम्हाला समजणार आहे.

 ॲप कसे डाऊनलोड करावे?                                                                    

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन जिओ आय मोबाईल ॲप डाऊनलोड करावे.
  • नंतर हे ॲप ओपन करावे आणि त्यामध्ये असलेल्या न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावी.
  • नंतर तुमचा आधार क्रमांक, तुमचे नाव तसेच तुमचा पत्ता व बँक खाते विषयीची आणि इतर आवश्यक माहिती भरून सबमिट करावे.
  • त्या पद्धतीने तुमचा पी एम किसान मोबाईल ॲप वर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
English Summary: pm kisan goi mobile application is useful for pm kisaan benificiary farmer
Published on: 16 March 2022, 03:47 IST