पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मधील एक योजना आहे. वर्षाकाठी सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून म्हणजेच 2000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना दिले जातात. परंतु या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी मध्ये बरेच अपात्र शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांकडून थेट बँक खात्यात जमा झालेली रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परंतु पात्र शेतकर्यांना शासनाकडून वारंवार स्मरणपत्रे देऊनही शेतकरी ही रक्कम परत करण्याबाबत कमालीचे उदासीन असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात जवळजवळ अशा अपात्र शेतकऱ्यांकडून 222 कोटी 18 लाख 38 हजारइतकी रक्कम येणे बाकी आहे. परंतु त्यातील फक्त 70 कोटी 53 लाख सात हजार रुपये परत भरली गेल्याची माहिती मुख्य सांख्यिकी अधिकारी जयंत टेकाळे यांनी दिली.
सरकारच्या चौकशीदरम्यान आयकर दाते शेतकरी तसेच गलेलठ्ठ पगार असलेले शेतकरी व्यक्तींनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाल्याची लक्षात आल्यानंतर अशा अपात्र शेतकऱ्यांना स्मरण पत्र देऊन त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम परत करण्यास सांगण्यात येते. परंतु सदरील रक्कम परत करण्यास शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद दिसत आहे. या पात्र शेतकऱ्यांच्या आकडेवारी जर पाहिले तर यामध्ये आयकर भरणारे एकूण दोन लाख 62 हजार 913 शेतकरी आहेत. यापैकी सुमारे 2 लाख 50 हजार 885 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कमीत कमी एक हप्ता जमा झाला आहे.
जर काही जिल्ह्यांचा विचार केला तर या योजनेअंतर्गत अपात्र शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक हे जळगाव जिल्ह्यात म्हणजेच एकूण 16046 शेतकरी अपात्र आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर सोळा हजार 262, सोलापूर 16101, नाशिक 13 हजार 397, सांगली 15 हजार 950, सातारा 22 हजार 59, पुणे जिल्ह्यात 21 हजार 141शेतकऱ्यांचा अपात्र तेत समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 1891 शेतकरी अपात्र आहेत. त्यांनी सात लाख 44 हजार रुपये परत केले आहेत. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपात्र शेतकऱ्यांनी 38 लाख 90 हजार, गडचिरोली जिल्ह्यात 43 लाख 76 हजार तर हिंगोली जिल्ह्यात 43 लाख 80 हजार रुपये परत केले गेले आहेत.
Published on: 23 June 2021, 02:30 IST