प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अपात्र असलेले शेतकऱ्यांकडून पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी कारवाई करून अशा पात्र शेतकऱ्यांकडून 15 लाख रुपये परत घेतले असून जवळपास 2 हजार अपात्र शेतकऱ्यांची खाती सील करण्यात आले आहेत
जे शेतकरी अपात्र आहेत अशांकडून मिळालेल्या लाभाची रक्कम परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागच्या पंधरा दिवसांमध्ये 196 बँकांकडून 14 लाख 98 हजार दोनशे 98 रुपये शासनाकडे परत करण्यात आलेअसल्याची माहिती समोर आली आहे.अशा अपात्र शेतकऱ्यांकडून जवळपास दोन कोटी 38 लाख 36 हजार रुपये वसूल केले जाणार आहे.
पी एम किसान सन्मान योजनेचे मिळालेले पैसे तात्काळ भरावेत यासाठी प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आले आहेत.परंतुया नोटीसांनाशेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी महसूल प्रशासनाने वसुलीसाठी अपात्र ठरलेल्या दोन हजार शेतकऱ्यांची बँक खाती सील केली.
प्रशासनाच्या कारवाईनंतर 47 अपात्र शेतकऱ्यांनी तीन लाख 56 हजार रुपये तर आयकर पात्र एक नऊशे दहा शेतकऱ्यांनी 90 लाख 70 हजार रुपयेयापूर्वीच भरले आहेत.जेशेतकरी लाभाची रक्कम परत करणार नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढवण्याची कारवाई केली जाणार असल्याचाइशाराही तहसीलदार श्री बेल्हेकर यांनी दिला आहे.
Published on: 11 December 2021, 02:01 IST